नागपूर दि.21 : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या वतीने नागपूर येथे ‘आधुनिक शेळी, कुक्कुटपालन व डेअरी फार्मिंग प्रशिक्षण कार्यक्रम’ चे आयोजन 27 ते 31 जानेवारी दरम्यान करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा उद्देश प्रशिक्षणार्थींनी पशुपालनाचे प्रशिक्षण घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरु करावा, असा आहे. पशुपालन क्षेत्रात स्वयंरोजगारासाठी लागणाऱ्या उद्योजकीय बाबिंची सविस्तर माहिती प्रशिक्षणात देण्यात येणार आहे.
या पाच दिवसांच्या प्रशिक्षणात शेळी, कोंबडी, गाई-म्हशींच्या जातींची निवड, पशूंना होणारे रोग व त्यावर लसीकरण, औषधोपचार, शेडचे बांधकाम, पोषक तत्वे व चारा व्यवस्थापन, विमा व्यवस्थापन, बाजारपेठ पाहणी तसेच प्रकल्प भेट इत्यादी विषयांवर प्रशिक्षण दिले जाईल. याबरोबरच स्वयंरोजगार कसा सुरु करावा, कर्ज विषयक योजनांची माहिती, विक्री व्यवस्थापन, प्रकल्प अहवाल तयार करणे इत्यादी बाबत सविस्तर माहिती देण्यात येईल.
इच्छुक प्रशिक्षणार्थींनी अधिक माहिती व प्रवेशासाठी एम. ई. सी. डी. उद्योग भवन, पहिला माळा, सिविल लाईन, नागपूर येथे कार्यक्रम सहाय्यक अश्विनी शेंडे (7498769424) किंवा प्रकल्प अधिकारी श्रीकांत कुळकर्णी (९४०३०७८७६०) यांचेशी 25 जानेवारी पूर्वी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. एमईसीडी तर्फे अशी प्रशिक्षणे तरुण वर्गात स्वयंरोजगार व उद्योजकता रुजवण्याच्या प्रयोजनाने आयोजित केली जातात. एमईसीडीद्वारे प्रकाशित केले जाणारे मासिक ‘उद्योजक’ याच दीर्घकालीन ध्येयाला वाहून घेतलेले आहे.