संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 19 – केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रत्येकाचे मतदान ओळखपत्र आधारकार्ड सोबत संलग्न करण्याचा निर्णय घेतला त्यानुसार कामठी तालुक्यात 1 ऑगस्ट पासून मतदान ओळखपत्र आधार कार्डाशी जोडण्याची मोहीम सूरु आहे.या मोहिमेदरम्यान नागरीकाचे मतदान कार्ड सोबत आधार कार्ड जोडणी करून घेतले जात आहे याअंतर्गत 58 कामठी विधानसभा मतदार संघातील 21 टक्के मतदारांनी मतदार ओळखपत्र आधार कार्ड सह लिंक केले असून 79 टक्के मतदारांचे मतदार ओळखपत्र आधारकार्ड ला लिंक करणे अजूनही बाकी आहे.
58 कामठी विधानसभा मतदार संघात एकूण 2 लक्ष 21 हजार 318 मतदार असून सर्वच मतदारांनी त्यांचे मतदार ओळखपत्र आधार कार्ड ला लवकरात लवकर लिंक करावे यासाठी तालुका प्रशासनातर्फे व्यापक स्तरावर मोहीम राबविली जात आहे.तर नुकतेच 11 सप्टेंबर ला राज्यव्यापी मतदार ओळखपत्र आधार कार्ड ला लिंक करण्याचे शिबीर देखील घेण्यात आले तसेच लिंक करण्याची प्रक्रिया कशी करावी याबाबतसुद्धा मतदारांना बीएलओ च्या माध्यमातून मार्गदर्शन केले जात आहे.या मोहीम तहसीलदार अक्षय पोयाम यांच्या नेतृत्वात निवडणुक विभागाचे सत्यजित चन्द्रिकापुरे व बीएलओ कर्तव्यदक्ष भूमिका साकारत आहेत.