आम आदमी पार्टीचा भव्य तिरंगा मार्च

आम आदमी पार्टी येणाऱ्या मनपा निवडणुकीत पूर्ण ताकतीने उतरणार – आमदार विशेष रवी

नागपुर – सर्वप्रथम आपण सर्वांना भारतीय संविधान दिवसाच्या शुभेच्छा आणि संविधान अनुरुप देशाला नवीदिशा देणाऱ्या आम आदमी पार्टी स्थापना दिवसाच्या ही शुभेच्छा !
यावर्षी देशाला स्वातंत्र मिळण्यास ७५ वर्षे पूर्ण झालीत. संपूर्ण देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे. आम आदमी पार्टी तर्फे देशात विविध ठिकाणी तिरंगा यात्रा काढून अमृत महोत्सव साजरा केल्या जात आहे. याचाच एक  हिस्सा म्हणून नागपुरात आम आदमी पार्टी कडून संविधान दिवसाचे औचित्य साधून आज नागपुरातील सहाही विधानसभा क्षेत्रातून तिरंगा यात्रा काढण्यात आली. पक्षाचे शेकडो कार्यकर्ते शहराच्या विविध भागातून तिरंगा यात्रा काढून मुंजे चौक येथे एकत्रित आलेत. तेथून व्हेरायटी चौक मार्गे ही तिरंगा यात्रा सम्विधान चौक येथे आली. तेथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून भरतीय संविधान अनुरुप कार्य व कर्तव्य करीत राहण्याची प्रतीज्ञा घेण्यात आली. तसेच जनतेस सम्विधान आत्मसात करुन त्याचे पालन करण्यास प्रोत्साहीत करण्याचा संकल्प करण्यात आला.

या तिरंगा यात्रेस  प्रमुख अतिथि म्हणून दिल्ली विधानसभेत करोलबाग येथून तीन वेळा निवडून आलेले लोकप्रिय आमदार श्री विशेष रवि, तर अध्यक्ष म्हणून आम आदमी पार्टी महाराष्ट्र संयोजक श्री रंगा राचुरे उपस्थीत होते. विदर्भ संयोजक डॉ देवेंद्र वानखड़े व महाराष्ट्र कोषाध्यक्ष जगजीत सिंग यांच्या नेतृत्वात हा तिरंगा मार्च काढण्यात आला होता.
भारतीय सम्विधानात देशातील केंद्र व राज्य सरकारने भारतीय जनते साठी करावयाच्या कार्या संबंधी मार्गदर्शक तत्व दिलेली आहेत. या मार्गदर्शक तत्वांचे तंतोतंत पालन करीत देशात पहिल्यांदा दिल्ली राज्यात मा. श्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात आम आदमी पार्टी चे सरकार जनतेकारिता काम करीत आहे. केजरीवाल सरकारने दिल्लीतील जनतेला मोफत व उत्कृष्ट शिक्षण व्यवस्था, मोफत व योग्य आरोग्य व्यवस्था, मोफत व माफक दरात वीज, महिन्याला प्रती कुटुंब २० हजार लिटर मोफत पाणी, माहिलांना मोफत बस प्रवास तसेच घरपोच आवश्यक सर्व सेवा देण्याचे कार्य केले आहे. आता हेच दिल्ली मॉडेल नागपुर च्या जनतेस उपलब्ध करुन देण्याचा संकल्प आम आदमी पार्टी नागपुर ने केला आहे.
नागपुरात मनपातील भाजपा सरकारने कांग्रेस नेत्यांच्या छुप्या संमतीने २४ x ७ पाणी पुरवठा योजनेच्या नावावर पाण्याचे खाजगीकरुन करून पाणी विकण्याचे काम केले आहे, नागपुरातील मनपाच्या शाळा बंद पाडण्यात आल्या आहेत, मनपा दवाखाने डॉक्टर, औषधे यांची जाणिव पूर्वक कमतरता ठेवून  चालविण्यात येत आहेत, कचरा उचलण्यापासून कर आकारणी कार्य खाजगीकरणाच्या माध्यमातून करण्यात येत आहेत. तसेच भाजपाच्या अनेक नेत्यांनी  स्वत: च्या अहंकारातून जनतेच्या माथी मारलेल्या महामैट्रो चा महा तोटा नागपुर च्या जनते कडून घर टैक्स व इतर कर प्रचंड प्रमाणात वाढवून वसुल केल्या जात आहे. नागपूरच्या जनतेची सुरु असलेली लुट व पिळवणूक थांबविण्यासाठी  आज आम आदमी पार्टी  घोषणा करीत आहे की येणाऱ्या नागपुर मनपा निवडणुका पक्ष स्वबळावर सर्व जागांवर लढविणार आहे. याकरिता आम आदमी पार्टीने आवश्यक तयारी ‘आपका महापौर’ या अभियान द्वारे सुरु केली आहे. संविधाननुसार नागरिकांना ज्या मुलभूत सुविधा देण्याची जबाबदारी मनपाची आहे, त्या सर्व मुलभूत सुविधा जनतेस मनपातील आम आदमी पार्टी चे सरकार देईल.
आज प्रेसला दिल्ली विधानसभेत करोलबाग येथून तीन वेळा निवडून आलेले लोकप्रिय आमदार श्री विशेष रवि, आम आदमी पार्टी महाराष्ट्र संयोजक श्री रंगा राचुरे, विदर्भ संयोजक डॉ देवेंद्र वानखड़े व महाराष्ट्र कोषाध्यक्ष जगजीत सिंग यांनी संबोधित केले.
यावेळी प्रामुख्याने अड़ राजेश भोयर, अम्बरीष सावरकर, अशोक मिश्रा, कविता सिंगल, डॉ जाफरी,
शंकर इंगोले, भूषण ढाकूलकर, राकेश उराडे, पीयुष आकरे, कृतल आकरे, शालिनी अरोरा प्रमुख्यनी उपस्तित होते.
आज तिरंगा रैली ला यशस्वी करण्यासाठी विधानसभा संयोजक रोशन डोंगरे, अजय धर्मे, लक्ष्मीकांत दांडेकर, आकाश कवाले, सुरेंद्र समुद्रे, गौतम कवले, शकील अली, विल्सन लियोनार्ड, राज कुंभारे, बबलू मोहाडिकर, पंकज मेश्राम, शुभम मोरे, विजय नन्दनवार, प्रतीक बावनकर, संतोष वैद्य, अमित दुरानी, दीपक बग्गा, क्लेमेंट डेविड, गुनवंत सोमकुंवर, प्रदीप पौनिकर, नामदेव कामडी, प्रभात अग्रवाल, प्रदीप पौनिकर, गुनवंत सोमकुंवर, हरीश गुरबानी, जितेंद मुरकुटे, पुष्प डाबरे, अलका पोपटकर,  प्रियंका कामडे, सचिन लोनकर, सचिन पारधी, इतर कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्तित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

वाहन सरगना गुप्ता की फर्म मेसर्सः बालाजी ट्रवल्स को 13 लाख ESIC भुगतान का नोटिस

Fri Nov 26 , 2021
  गुप्ता की मेसर्सःव्यंकटेश ट्रवल्स व चोधरी ट्रवल्स की जांच-पडताल शुरु मामला श्रम न्यायालय में न्याय प्रविष्टि निर्णय का इंतजार नागपूर – कोल फिल्ड्स लिमिटेड की अनुसांगिक सहायक कंपनी वेकोलि मे पिछले 15–20 सालों से वाहन आपूर्ती ठेका मामले मे ESIC चोरी की शिकायत के अधार पर मामले की जांचपडताल शुरु है, तत्संबंध मे शिकायतकर्ता आल इंडिया सोसल आर्गनाईजेशन का […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com