संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या मोदी पडाव रहिवासी तरुणाने राहत्या घरात 15 मे ला रात्री मानसिक तणावातून नैराश्येने किटकजन्य विषारी औषध प्राशन केल्याची घटना घडली असता उपचारार्थ कामठी च्या एका खाजगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारदारम्यान तरुणाचा आज सकाळी मृत्यू झाल्याची घटना घडली असून मृतक तरुणाचे नाव अनिकेत गणेश ढबाले वय 25 वर्षे रा मोदी पडाव कामठी असे आहे.
प्राप्त माहिती नुसार सदर मृतक तरुण हा आय टी आय चा फिटर ट्रेड चा विद्यार्थी असून एका नामवंत बेकरी दुकानात रोजंदारी पद्धतिने काम करायचा.
दरम्यान त्याला मोबाईल च्या ऑनलाइन गेम चा छंद लागल्याने त्या गेम च्या मानसिक तणावात किटकजन्य औषध प्राशन करून आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनेची नोंद करीत पुढील उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह कामठी च्या शासकीय श्वविच्छेदनगृहात हलवून मृतकाच्या पार्थिवावर शवविच्छेदन करीत पोलिसांनी तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.मृतकाच्या पाठीमागे आई व एक भाऊ असा आप्तपरिवार आहे.