संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 14 :- स्थानिक नविन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या लिहिगाव बोगद्याजवळ सर्व्हिस रोड जवळ लिहिगाव च्या गोदामकडे डबलसीट जाणाऱ्या दुचाकीस्वार तरुणाला भरधाव वेगाने विरुद्ध दिशेने येणाऱ्या कंटेनरनर चालकाने दिलेल्या जोरदार धडकेत घडलेल्या या गंभीर अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गतरात्री साडे दहा दरम्यान घडली असून मृतक तरुणाचे नाव बंडू डोमाजी बावणे वय 40 वर्षे राआसलवाडा तालुका कामठी असे आहे.यासंदर्भात आरोपी कंटेनर चालक विरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतक हिरो स्प्लेंडर दुचाकी क्र एम एच 40 सी बी 0161 ने लिहिगाव च्या गोदामकडे लिहिगाव बोगद्यातून सर्व्हिस रोड ने जात असता विरुद्ध दिशेने येणाऱ्या आरोपी कंटेनर क्र एम एच 40 सी डी 2281 चा चालकाने दिलेल्या जोरदार धडकेत गंभीर दुचाकीस्वाराला कामठी च्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले मात्र तोवर उपस्थित वैद्यकीय अधिकारी ने मृत घोषित केले त्यानुसार पोलिसांनी आरोपी कंटेनर चालक विरुद्ध भादवी कलम 337,279,304(अ)184 मोटार वाहन कायदा अनव्ये गुन्हा दाखल केला असून मृतकाच्या पार्थिवावर शवविच्छेदन करीत अंत्यसंस्कार करण्यात आले.या घटनेने आसलवाडा गावात शोककळा पसरली असून मृतकाच्या पाठीमागे पत्नी,एक मुलगा, एक मुलगी असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.