नागपूरचे योगाचार्य भरत गुप्ता दुबईत सम्मानित.

दुबईत योगाचार्य भरत गुप्ता, इंटरनॅशनल ह्युमॅनिटेरियन एक्सलन्स अवॉर्डने सम्मानित.

नागपूर :- इंटरनॅशनल ह्युमॅनिटेरियन एक्सलन्स अवॉर्ड 2023 फंक्शन दुबईतील, ला क्विंटा हॉटेलमध्ये, इंटरनॅशनल ह्युमन राइट्स एंबेसडर ऑर्गनायझेशन द्वारे आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये विविध देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. समाजाप्रती असलेली निष्ठा लक्षात घेऊन विविध क्षेत्रात असाधारण प्रतिभा दाखविणाऱ्यांचा गौरव करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.

या कार्यक्रमात योगाचार्य भरत गुप्ता यांना इंटरनेशनल ह्यूमेनिटेरियन एक्सीलेंस अवॉर्ड २०२३ देऊन गौरविण्यात आले. योगाचार्य भरत गुप्ता, ज्यांचे अध्यात्मिक नाव योगी सत्यानंद आहे, ते आंतरराष्ट्रीय योग प्रशिक्षक आहेत आणि यूएसए, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड, नेपाळ देशात गेली 13 वर्षे नि:स्वार्थपणे आणि विनामूल्य प्राचीन भारतीय योगशास्त्र शिकवतात. भारत आणि योगाचे नाव जगभर चमकवत आहे. त्याचप्रमाणे गेली 37 वर्षे ते देशात सर्वत्र नि:स्वार्थीपणे आणि मोफत योग शिकवत आहेत.

योगाचार्य भरत गुप्ता हे व्यवसायाने अभियंता आहेत आणि स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया (SAIL) मधून सहाय्यक महाव्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. आत्तापर्यंत त्यांनी आणि त्यांच्या पत्नी डॉ. सरोज गुप्ता, योगशिक्षिका, यांनी देश-विदेशात 5000 हून अधिक योग वर्ग/शिबिरे/सत्र आयोजित केले आहेत. योगाचार्य आणि डॉ. सरोज गुप्ता यांना देश-विदेशातील 50 हून अधिक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हे योग जोडपे नागपूर आणि भारताची शान आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अथिति लाभलेले बेल्जियमचे डॉ.आर्थर, इथिओपियाचे डॉ.ताथा, नेपाळचे डॉ.पिया रतन, इंग्लंडचे सतनाम देउचेकर, भारत सरकारचे डॉ.मनीष गवई आणि आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉ.अविनाश सुकुंदे यांची उपस्थिती होती. भारतासह इतर राष्ट्रांच्या प्रतिनिधींसह दुबईतील अनेक प्रतिष्ठित लोक या कार्यक्रमाला उपस्थित होते.

 

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com