नागपूर :- अखिल भारतीय महिला काँग्रेस अध्यक्षा अलका लांबा यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्षा संध्या सव्वालाखे यांच्या अध्यक्षतेखाली नागपूरातील संविधान चौकात “नारी न्याय आंदोलन” दि. २९ ॲागष्ट २०२४ रोजी सकाळी ११ वाजता सुरु होणार आहे.
महिला काँग्रेसचे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शहर कार्यकारणीच्या पदाधिकारींनी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष ॲड. नंदा पराते यांच्या नेतृत्वात ठिकठिकाणी महिलांशी जनसंपर्क अभियान सुरु केले. त्यामुळे या नारी न्याय आंदोलनात हजारोंच्या संख्येने महिला जोडण्यात आल्या आहेत. नागपूरात दि.२९ ॲागष्ट २०२४ रोजी संविधान चौकात सकाळी ११.०० वाजता होणाऱ्या नारी न्याय आंदोलनात महिलांनी लाल साडी अथवा लाल ड्रेस किंवा कोणतेही लाल वस्त्र परिधान करून यावे, असे आवाहन संगीता उपरीकर ,प्रणिता गायकवाड, पूजा बाबरा, शकुंतला वट्टीघरे, जयश्री धार्मिक, सुरेखा लोंढे, मंजू पराते, माया नांदुरकर, ज्योती जरोंडे, कल्पना गोस्वामी, पूजा देशमुख,स्नेहा पेटकर,रेखा बरवाड, प्रमिला धमगाये ,वर्षा देशमुख यांनी केले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या माध्यमाने नारी न्याय आंदोलन गुरूवार दिनांक २९ ॲागष्ट २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता संविधान चौक नागपूर येथे होणार असून या कार्यक्रमात राष्ट्रीय सरचिटणीस खासदार मुकूल वासनिक, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चैनीथल्ला, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, संसदीय नेते आमदार बाळासाहेब थोरात , महिला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अलका लांबा व प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्ष संध्या सव्वालाखे हे मार्गदर्शन करतील.
नारी न्याय आंदोलनासाठी नागपूर शहरातील महिला गणेश टेकडी, रेल्वे स्टेशनपासून पदयात्रा करीत संविधान चौकाच्या कार्यक्रमात पोहोचतील. महिलांनी या नारी न्याय आंदोलनात लाल रंगाचे वस्त्र परीधान करून मोठ्या संख्येने यावे यासाठी , मंदा बोबडे,अनिता हेडाऊ , ज्योती ढोके, रेखा थूल, वैशाली अड्याळकर,, बबिता भगत , वीणा दरवडे, रत्नमाला जाधव, रेखा काटोले, रेणू मून , निशा नीलटकर ,रेखा कुऱ्हाडकर, , शितल डोंगरे, कल्पना मंडपे, वर्षा नगरधनकर, शारदा रामटेके, शशिकला बुरडे,प्रमिला बुरडे,कोमल वासनिक, सुरेखा टेकाडे, संध्या बोकडे, शेवंता नंदनवार यांचे प्रयत्न सुरु आहेत .