स्त्रियांनी जीवनातील अडचणींचा धैर्याने सामना करावा – विद्या भीमटे

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :-  वैयक्तिक आणि व्यवसायिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी दररोज कठोर परिश्रम करणाऱ्या महिलांचा कौतुक करण्याचा हा जागतिक महिला दिनाचा सोहळा आहे.बऱ्याच लोकांसाठी महिलांची भूमिका केवळ घरातील कामे करण्यासाठीच मर्यादित असतात अशी आहे मात्र यामध्ये बदल होणे आवश्यक आहे कारण स्त्रिया ह्या आजच्या स्पर्धात्मक आधुनिक युगात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहेत.आणि सर्व क्षेत्रात यश पादांक्रित करीत आहेत.तेव्हा जीवनातील सर्व अडचणीचा स्त्रियांनी धैर्याने सामना करायला हवे असे मौलिक प्रतिपादन समाजसेविका विद्या भीमटे यांनी कामठी महिला संघ च्या वतीने आयोजित जागतिक महिलादिनाप्रसंगी व्यक्त केले.

कामठी महिला संघच्या वतीने 11 मार्च ला जयस्तंभ चौक कामठी येथे जागतिक महीला दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .या कार्यक्रमाचे उद्घाटन कामठी महिला संघ कामठीच्या मुख्य संघटिका विद्या भीमटे यांनी केले याप्रसंगी प्रमुख विचारक ऊषा बौद्ध, सामाजिक कार्यकर्ता चंदा  मगर,सामाजिक कार्यकर्ता, डॉ.सुधा मोहले मुंबई यांनी आपले मौलिक विचार व्यक्त करीत महिलांची दिशा आणि दशा यावर मौलिक मार्गदर्शन करीत महिला सक्षमीकरण करण्याचे सांगितले.दरम्यान महिलांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले तसेच लहान बालकांनी सुदधा कला प्रदर्शन केले.दरम्यान सामाजिक आदी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अर्चना सोमकुंवर होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुधा रंगारी यांनी केले. सूत्रसंचालन शिला मेश्राम व निशा रामटेके यांनी केले तर आभार प्रदर्शन शिल्पा नागदेवे यानी मानले. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिता  मेश्राम,वर्षा पाटिल यांनी केले.कार्यक्रमात हजारोच्या संख्येतील नागरिकांनी उपस्थिती दर्शविली असून कार्यक्रम यशस्वीरीत्या मोठ्या उत्साहात पार पडला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कामठी महिला संघ च्या समस्त महिला संघटकगण रेखा  पाटील, नंदा डोंगरे, प्रतिमा बेलेकर,विशाखा गेडाम, हेमलता  गेडाम, स्वद्रोपदी गेडाम, विशाखा गजभिए ,शेवंताआई चांदोरकर, पुष्पा कडबे, संगीता शेंदरे, स्वाती थोरात, रेखा  मेश्राम, मंजू वांद्रे,माधुरी उके,सुषमा शेंडे,रंजना गजभिए, नितू राऊत,सुजाता बावनगडे रमा पाटील, सुरेखा खोब्रागडे ,नंदा कापसे ,वंदना गोंडाणे, संगीता रहाटे,वंदना बन्सोड ,सुशिला  चव्हाण, पुष्पा रामटेके,योजनांचीवर् रंगारी,इंदिरा खांडेकर, वंदना गेडाम. मायावती घरडे. जिजाबाई वाहने, वर्षा तांबे संध्या  भालाधरे आदींनी मोलाची भूमिका साकारली .

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com