संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- ग्रामीण भागातील महिलांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा आदर्श ठेवून केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ घेऊन आत्मनिर्भर होऊन समाज कार्य करण्याचे आव्हान नागपूर जिल्हा परिषद च्या माजी अध्यक्ष निशा टेकचंद सावरकर यांनी तालुक्यातील पवनगाव ग्रामपंचायत व महिला बचत गटाच्या वतीने आयोजित जागतिक महिला दिन कार्यक्रमात मार्गदर्शन करताना व्यक्त केले कार्यक्रमाची सुरुवात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून करण्यात आले. यावेळी अंजली कानफाड़े युवामोर्चा महामंत्री नागपुर जिल्हा अकांशा अनिल चौधरी विदर्भ केसरी कुस्ती प्रथम विजयी किरण धनराज राऊत ,युवामोर्चा अध्यक्ष कामठी ग्रा, मंगला मनीष कारेमोरे भाजपा महिला आघाडी अध्यक्ष कामठी , नेहा किरण राऊत सरपंच पावनगाव धारगाँव रामचद्र मंगल रेवाळे उपसरपंच पावनगाव धारगाँव , सविता संजय काळे ,सुषमा राखडे, सरिता भोयर,उपस्थित होते पाहुण्याच्या हस्ते पवनगाव येथील अंकिता अनिल चौधरी यांना विदर्भ केसरी कुस्तीचा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा शाल श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला कार्यक्रमाचे संचालन माजी सरपंच किरण राऊत यांनी केले आभार प्रदर्शन नेहा राऊत यांनी केले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते