नागपूर :-धरमपेठ झोन अंतर्गत मोजा हजारीपहाड येथिल वार्ड क्र. 68 भूखंड क्र. 85, 86. 87,92, 96, 99, 101, 104, 108 व 109 कृषक महीला को.ऑप. हॉ. सोसायटी, हजारीपहाड, नागपुर ख. नं. 27, 28, 29, 33, 34, 35, 36 / 1.2. 3 या मालमत्तेवर दि. 09/12/2024 ला जप्तीची कार्यवाही केली असून सदहूं भूखंडाचे बकाया कर न भरल्यान सोसायटीचे भूखंड जप्त करण्यात आलेले आहे. सदर भुखंडा वरमालमत्ता कराची एकूण रक्कम 1104860/-रूपये आहे. जप्ती नंतर थकित मालमत्ताधारकांनी विहित मुदतीत कित मालमत्ता कराचा भरणा न केल्यास सदर भुखंड जाहिर लिलाव पध्दतीने विक्री करून थकित रक्कम वसूल करण्यात येईल. याची थकबाकी धारकांनी नोंद घ्यावी, अशी सूचना झोनचे उपायुक्त प्रकाश वराडे यांनी केली.
जप्तीच्या कार्यवाहीत धरमपेठ झोनचे उपायुक्त प्रकाश वराडे, अधिक्षक अनिल महाजन, विनोद मेश्राम, प्रदीप मांजरे व रवि जांभुळकर हे या बरिट कार्यवाहोत सहभागी झाले.
धरमपेठ झोन तर्फे थकीत मालमत्ता कराचे वसुलीसाठी दररोज वॉरंट कार्यवाहो करण्यात येत असून मालमत्ता बकायाधारकांना आव्हान/विनंती करण्यात येते की, त्यांनी आपले बकाया कराचा भरणा त्वरीत करावा व जप्ती टाळावी.