जनआस्थेचा विजय : विलेपार्ले (पूर्व) येथील जैन मंदिर स्थळी तात्पुरत्या शेडसाठी न्यायालयाची परवानगी

मुंबई :- विलेपार्ले (पूर्व) येथे जैन समाजाच्या श्रद्धास्थळी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर तात्पुरत्या शेडच्या उभारणीस न्यायालयाने परवानगी दिली आहे. हा निर्णय संबंधित प्रकरणात एक महत्त्वाचा टप्पा मानला जात असून, तो श्रद्धा आणि कायदेशीर मार्गाने चाललेल्या संघर्षाला दिलासा देणारा ठरला आहे.

या आदेशानंतर बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) च्या K/ईस्ट विभागामार्फत शेडच्या उभारणीसाठी तातडीने काम सुरू करण्यात आले आहे. पावसाळ्याच्या काळात श्रद्धास्थळ सुरक्षित राहावे, तसेच भाविकांना दर्शनाची सोय सुरळीतपणे व्हावी, यासाठी शेड उभारली जात आहे. या संरचनेमुळे धार्मिक कार्यक्रम नियमितपणे सुरू ठेवता येणार आहे. ही शेड केवळ संरक्षक उपाय नाही, तर जैन समाजाच्या श्रद्धेचे आणि भावनांचे रक्षण करणारा एक महत्त्वपूर्ण भाग देखील ठरणार आहे.

ही प्रक्रिया वेगात पार पडत असून त्यामागे राज्याचे कॅबिनेट मंत्री श्री मंगल प्रभात लोढा यांचे प्रयत्न महत्त्वाचे ठरले आहेत. त्यांच्या हस्तक्षेपामुळे आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच जैन समाजसाठी सकारात्मक गोष्ट घडताना दिसत आहे.

काही दिवसांपूर्वी या ठिकाणी असलेले मंदिर हटवण्यात आले होते, ज्यामुळे स्थानिक जैन बांधवांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती. मात्र, त्यांनी शांततेत आपल्या भावना व्यक्त करत न्यायालयाचा दरवाजा ठोठावला.

मंत्री श्री मंगल प्रभात लोढा यांनी या निर्णयाबाबत समाधान व्यक्त करत सांगितले, “हा फक्त धार्मिक श्रद्धेचा विषय नाही, तर जनआस्थेच्या विजयाची खूण आहे. आम्ही जैन बांधवांच्या भावनांना मान देऊन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलो. आजचा हा निर्णय त्यांच्या श्रद्धेला आधार देणारा आहे.”

या न्यायालयीन निर्णयामुळे विलेपार्ले पूर्वमधील जैन समाज आणि स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाची भावना असून, श्रद्धा आणि न्याय यांचा समतोल राखण्याचे हे सकारात्मक उदाहरण ठरले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

ॲड.दादासाहेब कुंभारे विद्यालय, नेरी व हरदास हायस्कुल, कामठी येथिल प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार

Mon May 19 , 2025
– आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाकरीता सहकार्य करणार – ॲड. सुलेखा कुंभारे कामठी :- नुकत्याच लागलेल्या एस.एस.सी. (१० वी) परीक्षेच्या निकालामध्ये ॲड. दादासाहेब कुंभारे विद्यालय नेरी चा १०० टक्के व हरदास विद्यालय, कामठी चा निकाल ९० टक्के लागलेला आहे सोमवार दि. १९/०५/२०२५ रोजी हरदास शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थेच्या अध्यक्षा ॲड. सुलेखा कुंभारे यांच्या शुभ हस्ते ॲड. दादासाहेब कुंभारे विद्यालय, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!