ट्रक दुचाकी अपघातात एक शालेय विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यु, तर दोघे गंभीर जख्मि

– संदीप कांबळे,कामठी

कामठी ता प्र 4:- कामठी- नागपूर मार्गावरील मोहम्मद अली पेट्रोल पंप समोर नागपूर हुन कामठी कडे भरधाव वेगाने विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीला दिलेल्या जबर धडकेत दुचाकीवर बसलेले तीन शालेय विद्यार्थी गंभीर जखमी झाल्या ची घटना दुपारी 2 दरम्यान वाजता घडली असता जखमी शालेय विद्यार्थ्यांना कामठी येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता यातील एका शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला तर दोन विद्यार्थी उपचार घेत आहेत. मृतक विद्यार्थ्याचे नाव निशांत महादेव पटले वय 17 वर्षे रा महावीर नगर रणाळा तर दोन जख्मि मध्ये अरब पप्पू चौधरी वय 17 वर्षे रा न्यू येरखेडा, व मयंक सिंग वय 17 वर्षे रा भिलगाव चा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 17 वर्षीय मृतक निशांत महादेव पटले हे ,अरब पप्पू चौधरी वय 17 राहणार न्यू येरखेडा कामठी, मयंक महेशकुमार सिंग वय 17 राहणार भिलगाव सोबत तिनही विद्यार्थी आर्मी पब्लिक स्कूल कन्टोनमेंट एरिया कामठी येथे 10 व्या वर्गात शिकत असून आज दुपारी एक वाजता तीनही शालेय विद्यार्थी मृतक निशांत महादेव पटले यांच्या मोटारसायकल क्रमांक एम एच 35 झेड 0579 वर त्याच्या वर्गातील मित्र अरब पप्पू चौधरी, मयंक महेशकुमार सिंग सह ट्रीपल सीट बसन कामठी नागपूर मार्गे भिलगाव येथे जात असताना विरुद्ध दिशेने नागपूर वरुन कामठी कडे जात असलेला ट्रक क्रमांक एम एच 40 वाय 2097 चालक नरेश चैतूराम शाहू वय 45 राहणार डीप्ती सिंगल कळमना नागपूर याने नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील चांदणी हॉटेल समोरील रोड च्या मध्यभागी डीवाईडर ओलांडून रॉंग साईडने कामठी कडे वेगाने जात असताना कामठी वरून भिलगाव कडे जात असलेल्या मोटारसायकलला जबर धडक दिल्याने तिनही शालेय विद्यार्थी गंभीर जखमी झाले त्यादरम्यान ट्रक चालक धडक मारून पुढे निघून गेला तिनही विद्यार्थी मोटरसायकल्सह रोड च्या मध्यभागी पडले त्यामुळे कामठी वरून नागपूर कडे जाणारी वाहतुक ठप्प पडली वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या मिल्ट्री इंजिनिअरिंग येथील भविंदर भैसारे राहणार सूनविहार यांनी यव इतर नागरिकांनी त्वरित घटनास्थळी येऊन तिनही गंभीर जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी कामठी येथे खाजगी रुग्णालयात पाठविले कामठी येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निशांत महादेव पटले वय 17 वर्ष राहणार महाविर नगर रनाळा याचा मृत्यू झाला दुसरे विद्यार्थी अरब पप्पू चौधरी ,मयंक महेशकुमार सिंग यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत घटनेची माहिती मिळताच यशोधरा पोलीस स्टेशन चे पोलिस पथकानी घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत दोन्ही वाहन यशोधरा पोलीस स्टेशनला जमा करून अपघाताला जबाबदार असलेला ट्रक चालक नरेश चैतूराम शाहू यांचे विरोधात यशोधरा पोलीस स्टेशनला कलम 304,अ ,343, 187 मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अटक केली अपघाताची माहिती निशांत महादेव पटले च्या आई-वडिलांना होताचे आई वडील खाजगी रुग्णालयात येऊन दुःखाचा हंबरडा फोडला तसेच घटनेची माहिती शाळेत पसरल्याने शाळा परिसरातही शोककळा पसरली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस सिरसाट करीत आहेत.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com