वाहतूक नियमांचे पालन करणा-यांना ‘ट्रॅफिक रिवॉर्ड्स’

– ३५ कोटींची बक्षीसे होणार वितरीत : ना. गडकरींच्या हस्ते अभिनव प्रकल्पाचे लोकार्पण शनिवारी

नागपूर :- ट्रॅफिक सिग्नलचे पालन करणा-या नागरिकांना बक्षीस मिळवून देणा-या ‘ट्रॅफिक रिवॉर्ड्स’ या अभिनव पथदर्शी प्रकल्पाचे शनिवार ३ जून २०२३ रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. वर्धा मार्गावरील हॉटेल रेडिसन ब्ल्यू येथे सायंकाळी ७ वाजता हा समारंभ पार पडेल.

याप्रसंगी मनपाचे अतिरिक्त आयुक्त तथा नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाने, उपायुक्त रविन्र्द भेलावे, कार्यकारी अभियंता (विद्युत) अजय मानकर, आदींची उपस्थिती असेल. ‘ट्रॅफिक रिवार्ड्स’ ॲप ही वाहतूक नियमांचे पालन करण्याच्या दृष्टीने राबविण्यात येणारी महत्वकांक्षी संकल्पना आहे.

याद्वारे नागपुरातील नागरिक जेव्हा ट्रॅफिक सिग्नलचे पालन करतील तेव्हा त्यांना या ॲपच्या माध्यमातून रिवॉर्ड पॉइंटस देण्यात येतील. शंभराहून अधिक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक ब्रँड्समधून रिवॉर्ड घेण्यासाठी हे पॉइंट वापरले जाऊ शकतील. या प्रकल्पाला भारत सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून निधी देण्यात आला आहे.

रिवॉर्ड्स मिळविण्यासाठी वापरकर्त्याला गूगल प्ले स्टोअर किंवा ऍपल स्टोअर वरून ट्रॅफिक रिवॉर्ड्स (Traffic Rewards) ॲप डाउनलोड करावे लागेल आणि त्यांचे तपशील नोंदवावे लागतील नोंदणी करणाऱ्या नागरिकांना ट्रॅफिक रिवॉर्ड्सचा (Traffic Rewards) टॅग त्यांच्या घरी मोफत दिला जाईल. त्यानंतर वापरकर्त्याला त्यांच्या वाहनावर हा टॅग लावावा लागेल. जेव्हा हा टॅग असलेले वाहन लाल सिग्नलवर थांबेल, तेव्हा तेथील RFID स्कॅनर आपोआप या टॅग ला स्कॅन करेल व नियम पाळणाऱ्या वाहन चालकाला त्याच्या ॲपमध्ये १० पॉइंटस मिळतील. अशाप्रकारे, प्रत्येक वेळी वापरकर्त्याने सिग्नलचे पालन केल्यावर पॉइंटस मिळतील. हे गोळा केलेले पॉइंट बीपीसीएल, बजाज अलायन्झ, पिझ्झा हट, केएफसी, किंगस्वे हॉस्पिटल, सिनेपोलीस, ॲलेक्सिस हॉस्पिटल इत्यादी १०० हून ब्रँडसोबत रिडीम केले जाऊ शकतात.

सध्या ही यंत्रणा नागपुरात १० सिग्नलवर लावण्यात आलेली आहे. काही आकर्षक बक्षिसांमध्ये बीपीसीएल पेट्रोल पंपावर मोफत पेट्रोल, बजाज अलायन्झकडून विमा प्रीमियमवर सूट आणि विविध ब्रँडवरील इतर आकर्षक ऑफर्स यांचा समावेश आहे. या ॲपवर सध्या ३५ कोटी रुपयांच्या ऑफर्स उपलब्ध आहेत.

हा प्रकल्प सोशल इम्पॅक्ट इनोव्हेशन्स प्रा.लि.तर्फे राबविण्यात आला असून व्हीएनआयटी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार आहे. नागपूर शहरात एक लाखाहून अधिक टॅग मोफत वितरीत केले जातील. नोंदणी करण्यासाठी नागरिक (www.trafficrewards.in) या संकेत स्थळाला भेट देऊ शकतात किंवा 7879066066 या क्रमांकावर Missed कॉल देऊ शकतात.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पर्यावरण जनजागृतीपर फोटोथॉन २०२३ छायाचित्रण स्पर्धा धोबीनगरात आज

Sat Jun 3 , 2023
– फोटोथॉन २०२३ छायाचित्रण स्पर्धा नागपुरात  –  इकोफोक्स, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ व ऑरेंज सिटी फोटोग्राफर्स क्लब तर्फे स्पर्धेचे आयोजन ; तब्बल ३ लाख रुपयांची पारितोषिके नागपूर :- इकोफोक्स, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ व ऑरेंज सिटी फोटोग्राफर्स क्लब तर्फे पर्यावरण प्रेमींसाठी आणि छायाचित्रकारांसाठी अनोखी पर्वणी उपलब्ध होत आहे. पर्यावरणाचे जतन करीत त्याचे महत्त्व छायाचित्रांच्या माध्यमातून पटवून देण्यासाठी फोटोथॉन २०२३ ही […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com