– कुही पोलिस स्टेशन हद्दीत कारवाई , एकुण 25 लाख 36 हजार रूपयांचा मुदेमाल जप्त
कन्हान :- जिल्हा वाहतूक पोलिसांच्या उमरेड पथकाने कूही पोलिस स्टेशन हद्दीत वाळू ची अवैध वाहतूक करणाऱ्यावर कारवाई करून एकुण 25 लाख 36 हजार रूपयांचा मुदेमाल जप्त केला. असुन आकाश संतोष अरतपायरे, वय 28 वर्ष, रा. उटी ता. उमरेड असे अटक करण्यात आलेल्या चालक आरोपीचे नाव तर मिलींद दिलीप तेलंग रा. मिरे ले आउट, बापु नगर, नंदनवन नागपुर असे अटक ट्रकमालकाचे नाव आहे. सदर कारवाई कुही फाटा येथे शनिवार दि.07 जून रोजी दुपारी अंदाजे 12.15 वा. दरम्यान कार्यवाही केली.
मिळालेला माहितीच्या आधारे वाहतूक पोलिस पथकांने नाकाबंदी करून एक पिवळया रंगाची असलेली 10 चक्का टिप्पर क्र. MH 49 1299 चांपा डाऊन भाग उमरेड ते नागपूर रोड येथे थांबवला असता त्यातील चालकास सदर वाहनामध्ये काय आहे असे विचारले असता, त्याने सदर वाहनामध्ये रेती भरलेले असल्याचे सांगीतल्याने त्यास रेतीचा परवाना (रॉयल्टी) बाबत विचारणा केली असता कोणत्याही प्रकारचा परवाना (रॉयल्टी) नसल्याने टिप्पर क्र. MH 49 1299 चा किंमत 25, लाख रूपये व टिप्पर मध्ये बिना परवाना 6 ब्रास रेती किंमत 6000 रूपये प्रती ब्रास प्रमाणे एकुण 36,000/- रूपये असा एकुण 25 लाख 36 हजार रुपयाचा मुदेमाल जप्त केला.
सदर कारवाई नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, जिल्हा वाहतूक शाखा,नागपूर ग्रामीण वरीष्ठ पोलीस निरीक्षक वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनात जिल्हा वाहतुक शाखा नागपुर ग्रामीण उमरेड पथक गजेंद्र चौधरी, मनिष कावळे,मनोज कारणकर, सुनिल शेळके, वैभव बोरपल्ले सह पोलीस स्टेशन कुही पोलीस चौकी व पाचगांव चौकी येथील कर्मचारी हरीदास चाचरकर, गणेश गोरुले, पंकज सारवे यांच्या पथकाने केली.
पुढील कार्यवाही करीता आरोपी व मुदेमालासह पो.स्टे. कुही पाचगांव चौकी येथे स्वाधीन करण्यात आले.
आरोपी विरूध्द कलम 303 (2),49 भारतीय न्याय संहिता 2023 सहकलम 48(7),48(8) महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 सहकलम 4, 21 खाणी आणि खनिजे (विकास आणि नियमन) अधिनियम 1957अन्वये गुन्हा नोंद केला.