मोतीराम रहाटे, प्रतिनिधी
श्री गजानन महाराजांची (दि.३ ते ६ जानेवारी) नागपुर ते रामटेक पायी दिंडी पालखी यात्रा.
कन्हान (नागपुर) : – श्री संत गजानन महाराज सेवा समिती टिमकी नागपुर व्दारे श्री संत गजानन महाराजांची नागपुर ते श्रीक्षेत्र रामटेक पायी दिंडी पालखी यात्रा शाही थाटात आज ३ जानेवारी सकाळी टिमकी तीन खंबा चौक नागपुर येथुन प्रस्थान करून सायंकाळी कन्हान नदी काठावरील काली माता मंदीर सत्रापुर रोड कन्हान ला आगमन होऊन जय काली माता सेवा समिती तर्फे भव्य स्वागत सत्कार करण्यात येणार आहे.
मंगळवार (दि.३) जानेवारी २०२३ ला सकाळी ६ वाजता श्रीसंत गजानन महाराज सेवा समिती टिम की नागपुर व्दारे श्री संत गजानन महाराजांची नागपुर ते श्रीक्षेत्र रामटेक पायी दिंडी पालखी यात्रा शाही थाटा त टिमकी तीन खंबा चौक नागपुर येथुन प्रस्थान करू न श्री गजानन महाराज मंदिर प्रेमनगर, शांतीनगर कॉलोनी मैदान येथे पालखीचे स्वागत, श्री भवानी माता मंदीर कळमना येथे फराळ पाणी, कामठी येथे आगमन मोदी राम मंदीर येथे दुपारचे जेवण, प्रवचन व अल्प विश्रांती नंतर सायंकाळी कन्हान नदी काठावरी ल काली मंदीरात आगमन होऊन जय काली माता सेवा समिती तर्फे भव्य स्वागत सत्कार करून किर्तन, आरती , महाप्रसाद व रात्री मुक्काम. बुधवार (दि.४) जानेवारी ला सकाळी ७ वाजता पालखी प्रस्थान, कन्हान नगर प्रदक्षिणा श्री काकडे निवास येथे चाय नास्ता, श्री आखरे निवास कांद्री येथे अल्पोहार नंतर बोरडा-नगरधन मार्गे “जय गजानन, जय गजानन”, “गण गण गणात बोते ” च्या गजरात श्री श्रेत्र रामटेक करिता प्रस्थान करण्यात येईल. पालखीत ३०० पेक्षा अधिक महिला व पुरुष वारकरी राहणार असुन यात पालखी चोपदार, पताकाधारी, गायनाचारी, मृदंगाचारी , टाळकरी, विणाधारी व फुलांनी सजलेल्या पालखीत महाराजाची मुर्ती असणार आहे. (दि.५) जानेवारी २०२३ ला पालखी गडमंदिर रामटेक येथे पोहोचेल. सर्व भाविक भक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवा हन समितीचे प्रचार प्रमुख श्याम गडवे यांनी केले आहे.