संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- सामाजिक ऐक्य आणि सद्भावणेचे प्रतीक असलेल्या रमजान ईद निमित्त नवीन कामठी पोलीस स्टेशन येथे आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीत डुकरांच्या समस्येचा विषय चांगलाच गाजला.
नागपूर जिल्ह्याचे उपनगर मानले जाणाऱ्या कामठी शहरात विविध धर्मीय नागरिक वास्तव्यास असून प्रत्येक सन मोठ्या गुण्यागोविंदाने साजरा करतात. नुकतेच हनुमान जयंती,महावीर जयंती ,डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात पार पडले.याच धर्तीवर उद्या 22 एप्रिल ला मुस्लिम धर्माचा पवित्र सण मानला जाणारा रमजान ईद पर्व उत्साहात पार पडावा, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न व्हावी याची दक्षता घेत विचारांची देवाणघेवाण करीत मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात यावे यासाठी जुनी कामठी पोलीस स्टेशन तसेच नवीन कामठी पोलीस स्टेशन ची संयुक्त बैठक एसीपी नलावडे यांच्या अध्यक्षतेखाली नवीन कामठी पोलीस स्टेशन सभागृहात शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आल्या त्यावर तोडगा काढून योग्य तो मार्ग काढण्याच्या सूचना देण्यात आल्या दरम्यान शहरात सध्यस्थीतीत डुकरांच्या समस्येचा विषय चांगलाच गर्तेत आला असून डूकरावर मरणाची साथ आली असून दररोज डुकरांचा दुर्गंध वाहतो तेव्हा प्रशासनाने यावर गंभीर दखल घेत डुकर पकडो मोहीम राबवाव्या अश्या सूचना करण्यात आल्या.यावर वाहतूक,नागरी समस्या,आदी विषयावर सकारात्मक चर्चा करण्यात आल्या दरम्यान पोलीस विभागातर्फे देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करीत रमजान ईद उत्साहात पार पाडावी व कायदा ,सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन करण्यात आले.
याप्रसंगी पोलीस निरीक्षक कमलाकर गड्डीमे,पोलीस निरीक्षक दीपक भिताडे,वाहतूक पोलीस निरीक्षक गोसावी ,कर अधीक्षक आबासाहेब मुंडे आदी उपस्थित होते.