चेंबूरच्या श्री नारायण मंदिर समितीचे शैक्षणिक कार्य कौतुकास्पद – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

मुंबई :- चेंबूर येथे गेल्या ६१ वर्षांपासून शैक्षणिक कार्य करीत असलेल्या श्री नारायण मंदिर समितीचे सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे कार्य कौतुकास्पद आहे. विद्यार्थ्यांना शिक्षित करणाऱ्या अशा संस्थांची समाजाला अधिक गरज आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी केले.

राज्यपालांच्या उपस्थितीत चेंबूर येथील श्री नारायण मंदिर समिती या सामाजिक शैक्षणिक संस्थेचा ६१ वा वर्धापन दिन आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी राज्यपाल श्री.राधाकृष्णन बोलत होते. यावेळी श्री नारायण मंदिर समितीचे अध्यक्ष एन.मोहनदास, राज्यपालांचे उपसचिव एस. राममूर्ती, समितीचे उपाध्यक्ष एस. चंद्राबाबू, इतर पदाधिकारी तसेच शिक्षक व निमंत्रित उपस्थित होते.

राज्यपाल श्री.राधाकृष्णन म्हणाले की, संस्थेने नऊ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन त्यांच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणले आहे. नारायण गुरु यांनी जातीभेद व धर्मभेद विरहित समाजाची संकल्पना मांडली व समतेचा पुरस्कार केला. त्यांची शिकवण अंगीकारली तर आपण निश्चितपणे अधिक प्रगती करु.

श्री नारायण मंदिर समिती शिक्षण संस्था गेल्या सहा दशकांपासून गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी आधुनिक शिक्षणाची व्यवस्था करीत आहे. वडील दीना बामा पाटील यांच्यापासून आपण संस्थेसोबत कार्य करीत आहोत. या संस्थेच्या कार्यातून इतर शैक्षणिक संस्थांनी प्रेरणा घ्यावी, असे आवाहन खासदार संजय दीना पाटील यांनी यावेळी केले.

यावेळी राज्यपालांच्या हस्ते संस्थेच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले तसेच माजी पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. सुरुवातीला राज्यपालांनी संस्थेच्या आवारातील श्री नारायण गुरु मंदिरात जाऊन नारायण गुरूंची आरती पूजा केली.

संस्थेचे महासचिव ओ.के.प्रसाद यांनी प्रास्ताविक केले तर अध्यक्ष एम.आय.दामोदरन यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. समितीचे उपाध्यक्ष एस. चंद्राबाबू यांनी आभारप्रदर्शन केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

IRCTC के खिलाफ जांच की मांग: यात्रियों के अधिकारों की रक्षा के लिए एक महत्वपूर्ण कदम

Tue May 20 , 2025
नई दिल्ली :- ग्रहक भारती नामक उपभोक्ता अधिकार संगठन ने आईआरसीटीसी (भारतीय रेलवे खानपान एवं पर्यटन निगम लिमिटेड) के खिलाफ जांच की मांग की है। संगठन का आरोप है कि आईआरसीटीसी यात्रियों से “सुविधा शुल्क” के नाम पर अत्यधिक राशि वसूल रहा है और वेबसाइट रखरखाव के नाम पर बड़े पैमाने पर खर्च कर रहा है।उक्त मांग सह आरोप अधिवक्ता […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!