मोतीराम रहाटे, प्रतिनिधी
धर्मराज प्राथमिक शाळेत स्वयं रोजगाराचा बाल आनंद मेळावा.
कन्हान (नागपुर) : – शालेय जिवनात शिक्षणा सोबत स्वयं रोजगाराचे धडे गिरवले तर येणारी पिढी स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभी होईल. त्यामुळे बाल वयातच स्वयं रोजगाराचे धडे दिले पाहिजे, असे आवाहन शिक्षक नेते मिलिंद वानखेडे यांनी बाल आनंद मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी केले.
धर्मराज प्राथमिक शाळेत (दि.४) जानेवारीला स्वयं रोजगारक्षम बालआनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे उद्घाटन नागपुर विभागाचे शिक्षक नेते मिलिंद वानखेडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष धनंजय कापसीकर,मुख्याध्यापक खिमेश बढिये, ऑटो युनियन अध्यक्ष गज्जु बल्लारे, पर्यवेक्षक सुरेंद्र मेश्राम, ऑटो युनियनचे सदस्य मुकुंद उंबजकर, चंद्रशेखर मोटघरे उपस्थित होते.
यावेळी चिमुकल्यांनी तब्बल ६० स्टाॅल लावुन आपल्या पाक कृतीचा आस्वाद मुलांना दिला. या बाल आनंद मेळाव्यात पाणीपुरी, भेळ, समोसा, कचोरी, गुलाब जामुन, गाजर हलवा, रवा लाडु , कांदा भजी, आलु भजी, सॅन्डविच, ब्रेड पकोडे, पुरीभाजी, चना पोहा, चहा, पावभाजी, पिंगर, डोसा, अप्पे, इडली, लसुन पराठा, झुनका भाकरी, साबुदाणा वडा, उकडले ले बोर, ऊस, ढोकळा, कच्चा चिवडा, लिंबु सरबत या सारख्ये विविध व्यंजनाचे स्टाॅल लावण्यात आले होते.
उपस्थित मान्यवरांनी व शिक्षकांनी चिमुकल्यांच्या या धाडसी संस्कारक्षम स्वयं रोजगाराचे कौतुक करीत भविष्यात मोठे उद्योजक बनावे अशा शुभेच्छा दिल्या. या बाल आनंद मेळाव्याचे आयोजन हर्षकला चौधरी व अर्पणा बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली यशस्विपणे करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन भिमराव शिंदे मेश्राम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भिमराव शिंदे मेश्राम, राजु भस्मे, अमित मेंघरे, किशोर जिभकाटे, चित्रलेखा धानफोले, शारदा समरीत, प्रिती सुरजबंसी, पूजा धांडे, कांचन बावनकुळे, वैशाली कोहळे, दिनेश ढगे, सतीश राऊत, तेजराम गवळी, नरेंद्र कडवे, छाया कुरुटकर, कोकीळा सेलोकर, माला जिभकाटे, सरीता बावनकु ळे, प्रशांत घरत, संजय साखरकर, सुनीता मनगटे, सुलोचना झाडे, नंदा मुद्देवार, संगीता बर्वे आदीनी सहकार्य केले.