संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान :- पोलीस स्टेशन अंतर्गत खंडाळा घटाटे कडुन कन्हान कडे अवैधरित्या चोरीच्या वाळुची वाहतुक करणाऱ्या टाटा कंपनीचा वाहनाला पोलीसांनी जप्त करुन कारवाईत एका आरोपीला ताब्यात घेऊन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
प्राप्त माहिती नुसार मंगळवार (दि.७) जुन रोजी दुपारी कन्हान पोलीस अवैध धंध्यावर कारवाई करणे कामी पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांचा मार्गदर्शनात आकाश सिरसाट, आतिश मानवटकर सह अन्य पोलीस कर्मचारी परिसरात पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदारा कडुन माहिती मिळाली कि खंडाळा घटाटे कडुन कन्हान कडे टाटा कंपनीचा छोटा हाती वाहना मध्ये अवैधरित्या चोरीच्या वाळुची वाहतुक होत आहे. अशा माहिती वरुन पोलीसांनी गहुहिवरा रेल्वे पुलावर नाकाबंदी केली असता टाटा कंपनीचा छोटा हाती वाहन क्र. एमएच ४० बी.जी. ९११३ हा वाळु वाहतुक करतांना मिळुन आल्याने पोलीसांनी त्यास थांबवुन वाहनाची पाहणी केली असता वाळु दिसुन आली. वाहन चालक अजय दिलीप पानतावने वय २८ वर्ष रा.खंडाळा याला वाळु बाबत कागदपत्रे विचारले असता त्यांने कुठल्याही प्रकारचे कागदपत्रे, परवाना नसल्याचे सांगितल्याने पोलीसांनी वाहन चालकास ताब्यात घेऊन त्याचे जवळुन १/२ ब्रास वाळु किंमत २५०० रुपये आणि टाटा कंपनीचा वाहन किंमत ३,००,००० रुपये असा एकुण ३,०२,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहे.