मोराराजी टेक्सटाईल्स कामगारांच्या आंदोलनाला सहकार्य करा

संदीप बलवीर,प्रतिनिधी

– जिल्ह्यातील सर्व कंपनी कामगारांनी एक दिवस काम बंद आंदोलन करा

– मोराराजी कामगारांची सर्व कामगारांना भावनिक साद

नागपूर :- बुटीबोरी औधोगिक क्षेत्रातील कपडा उत्पादन करणाऱ्या मोराराजी टेक्सटाईल्स कंपनीच्या स्थायी आणि आस्थायी अशा जवळपास 2 हजार कामगारांनी आपल्या न्याय्य मागाण्यांसाठी कंपनी व्यवस्थापनाच्या विरोधात 17 एप्रिल पासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरु केले. व्यवस्थापन,शासन व प्रशासनाने आंदोलनाची कुठलीही दखल न घेतल्याने 8 मे रोजी विष प्राशन आंदोलन करून सामूहिक आत्महत्या करण्याचा इशाराही दिला होता. परंतु व्यवस्थापनाने पोलीस प्रशासनाला हाथाशी धरत कामगारांवर दडपशाही चे धोरण आखून व कायद्याचे डोज पाजून विष प्राशन आंदोलन दडपून टाकले. त्यानंतरही आजपर्यन्त जवळपास 19 दिवसांचा कालावधी उलटूनही कंपनी व्यवस्थापन, शासन व प्रशासनाला जाग आली नाहीं. त्यामुळे आज मोराराजी टेक्सटाईल्स च्या कामगारांनावर आलेली वेळ भविष्यात आपणावरही येऊ शकते म्हणून मोराराजी कंपनी कामगारांच्या समर्थनार्त नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी,हिंगणा, उमरेड व कळमेश्वर औधोगिक क्षेत्रातील प्रत्येक कंपनीत काम करणाऱ्या कामगारांनी दि 1 जून ला एक दिवस कंपनी बंद आंदोलन करून मोराराजी कामगारांच्या पाठीशी उभे राहावे असे भावनिक आव्हाण वंचित बहुजन आघाडी माथाडी कामगार युनियन चे जिल्हा अध्यक्ष विवेक वानखेडे यांनी केले आहे.

मोराराजी टेक्सटाईल्स कंपनी व्यवस्थापनाने कंपनीतील स्थायी व आस्थायी कामगारांचे दिवाळी बोनस ले ऑफ चे वेतन,26 दिवस काम व ठराविक ताऱखील पगार न देता कामगारांची आर्थिक व मानसिक पिळवणूक करीत कामगारांवार उपासमारीची वेळ आणून ठेवली आहे.कंपनी कामगार आपल्या व्यथा, समस्या व प्रश्न घेऊन शासन व प्रशासनाच्या दारोदारी भटकत आहे. अनेकदा भेटी,बैठका घेत आहेत परंतु कुणीही कामगारांच्या मागण्याकडे लक्ष दिलेले नाहीं. यासाठी कामगारांनी आंदोलनाचा पवित्रा घेत भीक मांगो, जलसमाधी, विष प्राशन विरुगिरी आंदोलन करूनही असनवेदनशील शासन प्रशासनाला कामगारांच्या व्यथा कळल्या नाहीं कि हेतू पुरस्सर याकडे दुर्लक्ष करून कामगारांच्या भावनाचा बाजार मांडत आहे हे कळायला मार्ग उरला नसल्यामुळे लोकशाही व्यवस्थेत लोकशाहीचे संरक्षण करण्यासाठी व आपल्या कामगार बांधवाना न्याय मिळवून देण्याकरिता जिल्ह्यातील सर्व औधोगिक क्षेत्रातील सर्व कंपनी कामगारांनी मोराराजी कामगारांकरिता दि 1 जून ला प्रतिनिधिक काम बंद आंदोलन करावे अशी भावनिक साद मोराराजी कामगारांच्या वतीने दिली आहे.

कामगारांच्या श्रमावर, घामावर सुरु असलेले गिरण्यांचे भोंगे कामगार कधीही बंद पाडू शकतो व शासनाला व प्रशासनाला हादरवून सोडू शकतो हे आपल्याला दाखवून द्यावे लागेल.कारण आज मोराराजी कंपनीच्या कामगारांवार आलेली पाळी भविष्यात तुमच्यावर येणार नाहीं याची काहीही शाश्वती नसून कष्टकरी, कामगार व मजुरांच्या जीवनाचा, जगण्याचा व अन्नाचा खेळ करण्यासाठी शासन प्रशासन देशभर खाजगीकरणाचे धोरण अवलंबित असल्याने त्यावर कुठे तरी आला बसावा म्हणून कामगार शक्ती दाखवीत मोराराजीच्या आंदोलनाचे लोन संपूर्ण महाराष्ट्रात पेटवायचे असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे नागपूर ग्रामीण जिल्हा सचिव आनंद मेश्राम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

NewsToday24x7

Next Post

पारशिवनी व खापरखेडाच्या स्काऊट्स गाईड्सचें नेशनल कॅम्पसाठी निवड

Sun May 28 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – उद्या समूह होणार दिल्ली रवाना पारशिवनी :- भारत स्काउट्स आणि गाईड्सचें राष्ट्रीय मुख्यालय आणि नेशनल यूथ एडवेंचर इंस्टिट्यूट , हरियाणा यांच्या अंतर्गत नेशनल यूथ कॉम्प्लेक्स, गड़पुरी हरियाणा येथे 86 वे नेशनल एडवेंचर कॅम्प आयोजित करण्यात आले आहे . या कॅम्पसाठी नागपुर जिल्ह्यातील खापरखेडा आणि पारशिवनीचे एकूण आठ स्काऊट्स आणि पाच गाईड्सची निवड झालेली आहे, ज्यामध्ये […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com