संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक जुनी कामठी पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या जुनी खलाशी लाईन, कादर झेंडा रहिवासी एका 20 वर्षीय तरुणीवर पीडित मानसिक दृष्ट्या कमजोर असल्याचा फायदा घेत आरोपितांनी वेगवेगळ्या ठिकाणी लैंगिक अत्याचार केल्याची घटना 1 फेब्रुवारी 2023 ते 6 मे 2023 या कालावधीत घडली असून यासंदर्भात फिर्यादी पीडित मतिमंद तरुणीच्या आईने स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध भादवी कलम 376,376(2)(1)एल 354 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.या प्रकरणाशी निगडित असलेल्या काहींना जुनी कामठी पोलीस स्टेशन ला बोलावून विचारपूस करून सोडण्यात आले मात्र यातील एका इसमाने स्वतःच्या आब्रूवर निशाणा साधण्यात आला या मानसिक संतापातून स्वतःच्या गळ्यावर व पोटावर ब्लेड ने वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असून उपचारार्थ नागपूर च्या शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर पीडित तरुणी ही मतिमंद असल्याच्या फायदा घेत अनोळखी आरोपीनी तिच्या मानसिक दृष्टया कमजोरी चा फायदा घेत तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले तसेच या पीडित तरुणीच्या पोटाला कळा गेल्याने पोट खूप दुखत असल्याने पीडित तरुणीच्या आईने संशय बळकावला ज्यावर कदाचित तिला गर्भधारणा झाली असावी असा आरोप करीत जुनी कामठी पोलीस स्टेशन ला तक्रार नोंदवली होती त्यानुसार फिर्यादी ने पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अनोळखी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानुसार फिर्यादी ने संगीतलेल्या नावाच्या इसमाना पोलीस स्टेशन ला बोलावून विचारपूस करणे सुरू होते मात्र यावर मानसिक संताप घेत एका 62 वर्षीय इसमाने स्वतःचा गळा कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असून पुढील तपास सुरू आहे.