अरोली :- खात – रेवराल जिल्हा परिषद क्षेत्र अंतर्गत येत असलेल्या घोटमुंढरी ते मोरगाव या रेल्वे अंडरब्रिज मध्ये पाणी साचल्याने व ते निकाशी होत नसल्याने, घोटमुंढरी व परिसरातील विश्वमेघ विद्यालय धर्मापुरी येथे शिकणारे माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थी याच मार्गाने शाळेत जात असल्याने , परंतु या अंडरब्रिज मध्ये पाणी साचल्याने त्यांना घोटमुंढरी- खात या मार्गाने धर्मापुरी येथे महाविद्यालयात फेऱ्याने जावे लागत असल्याने, विद्यार्थ्यांसह या अंडरब्रिज परिसरात शेती असणारे शेतकऱ्यांसह या मार्गाने जाणारे येणारे वाहनधारकही कमालीचे त्रस्त आहेत.
याबाबत घोटमुंढरी येथील शेतकरी व विद्यार्थ्यांना विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की, या अंडरब्रिजचे पाणी काढण्याचे कंत्राट अजय त्रिपाठी नामक ठेकेदाराला दिले असून त्याने घोटमुंढरी येथील अंडरब्रिजचे इंजिनच्या माध्यमातून पाणी काढणाऱ्या संबंधित व्यक्तीला कामाचा पूर्ण मोबदला मागील तीन महिन्यापासून दिला नसल्याने, तेथून पाणी निकासी करणे बंद असल्याने त्या अंडरब्रिज मध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आहे. याबाबत कंत्राटदार अजय त्रिपाठी यांना भ्रमणध्वनी केले असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. या कामाचे इतवारा स्टेशन मधील संबंधित अभियंता अभिषेक निनावे यांना भ्रमणध्वनी वरून विचारपूस केली असता ठेकेदाराचे बिल रेल्वे विभागाकडे प्रलंबित असल्याने त्याने संबंधित इंजिन धारकाला त्याची रक्कम अदा केली नाही, दोन ते तीन दिवसात ठेकेदाराला त्याची प्रलंबित रक्कम मिळणार असून तो ती रक्कम संबंधित इंजिन धारकाला देणार असून दोन-तीन दिवसानंतर पाणी निकाशी चे काम सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
रेल्वे अंडरब्रिज मधील साचलेले पाणी काढण्याचे काम लवकरात लवकर करावे अशी मागणी विद्यार्थी मधुसूदन मेंढे ,मनीष शेंडे ,आयुष पटले, प्रणय देवतारे, सुजल पटले, विकी श्रावणकर ,ऋषी पटले, विनीत पटले, शेतकरी व्यंकटराव चिंतला, जुगल भोंगाडे, पौर्णिमा मोहतूरे, भागो साठवणे, कोटेश्वरराव चिंतला बादल रामटेके सुरेश मोहतुरे ,शिनु बंता , इतर विद्यार्थी व शेतकऱ्यां सह अंडरब्रिज वरून नियमित जाणे येणे करणारे वाहनधारकांनी केली आहे.