दिलखुलास’ कार्यक्रमात डॉ. सदानंद मोरे यांची विशेष मुलाखत

मुंबई :- मराठी भाषेला ‘अभिजात भाषेचा दर्जा’ देण्याचा केंद्र सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला. त्याअनुषंगाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात या विषयावर महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष डॉ.सदानंद मोरे यांच्या विशेष मुलाखतींचे प्रसारण होणार आहे.

केंद्र सरकारच्या या निर्णयाने मराठी भाषा सातासमुद्रापार जगभरात आणखी जास्त वेगाने आणि प्रभावीपणे पोहोचणार आहे. मराठी भाषेला मोठा इतिहास आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे मराठी भाषेचा गौरवशाली इतिहास, समृद्ध सांस्कृतिक वैभव जगभर पोहचण्यास मदत होणार आहे. याचबरोबर मराठी भाषेच्या बोलींचा अभ्यास करण्यास प्रोत्साहन मिळणार असून, संशोधन आणि साहित्यसंग्रह करण्याच्या दृष्टीने चालना मिळणार आहे. त्याअनुषंगाने अभिजात भाषेचा दर्जा म्हणजे काय? आणि अभिजात दर्जा बहाल केल्यास मराठी भाषेत नेमके काय बदल होणार असून आणि मराठी भाषेचा इतिहास काय आहे या विषयी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून डॉ. सदानंद मोरे यांनी माहिती दिली आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत दि. 18, 19, 20, 21 आणि सोमवार दि. 23 डिसेंबर 2024 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर’या मोबाईल अॅपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. ज्येष्ठ निवेदक दिपक वेलणकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२५ ची ८.१३% टक्के दराने परतफेड

Sat Dec 14 , 2024
मुंबई :- राज्य शासनामार्फत ८.१३% महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२५ अदत्त शिल्लक रकमेची १३ जानेवारी, २०२५ पर्यंत देय असलेल्या व्याजासह दि. १४ जानेवारी, २०२५ रोजी सममूल्याने परतफेड करण्यात येणार असल्याचे वित्त विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. उपरोक्त दिनांकास सुटी जाहीर केल्यास, राज्यातील अधिदान कार्यालय, कर्जाची परतफेड अगोदरच्या कामाच्या दिवशी करेल. या कर्जावर दि. १४ जानेवारी, २०२५ पासून व त्यानंतर कोणतेही व्याज […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!