संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- भारताच्या सशस्त्र दलांच्या धैर्याचा आणि बलिदानाचा सन्मान करण्यासाठी तसेच देशाचे वीर शहीद सुपुत्रांना नमन करण्याकरिता भाजपा प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री आणि नागपूर अमरावती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा अध्यक्षतेखाली उद्या १६ मे रोजी सकाळी ८ वाजता सिंदूर सन्मान तिरंगा यात्राचे आयोजन करण्यात आले आहे.
नागपूर जिल्हा अंतर्गत येणाऱ्या कामठी/मौदा विधानसभा क्षेत्रातील कामठी शहरामध्ये जयस्तंभ चौक येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातून या तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे , सर्वप्रथम डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून ही यात्रा सुरु होईल. तिरंगा यात्रा बस स्टेशन,यादव हॉटेल चौक मार्गे नेताजी चौक येथील सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून समाप्त होईल. देशाचे वीर शहीद सुपुत्रांना नमन आणि भारतीय लष्कराला मोठे यश, विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे..