गुणवंत विद्यार्थांचा सत्काराने शिवराज्याभिषेक सोहळा थाटात

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कन्हान :- सकल हिंदू समाज कन्हान क्षेत्राच्या वतीने दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थांचा आणि राज्यस्तरीय सिलंबम स्पर्धेत एकुण चार मेडल जिंकुन कन्हान शहराचे नाव लौकिक करणाऱ्या शिवशंभु आखाड्याचे कोच आणि खेडाळुंचा सत्कार करुन शिवराज्याभिषेक सोहळा थाटात साजरा करण्यात आला.

शुक्रवार (दि.६) जुन रोजी शिवराज्याभिषेक सोहळा दिवस निमित्य सकल हिंदु समाज कन्हान क्षेत्र द्वारे दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थांचा भव्य सत्कार सोहळा छत्रपती शिवाजी चौक तारसा रोड टी पॉंईट येथे करण्यात आला. कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित जेष्ठ सामाजसेवक जीवन मुंगले, जेष्ठ नागरिक भरत सावळे, नारायण गजभिये, माजी नगरसेवक राजेंद्र शेंदरे, दखने हायस्कुल कन्हानच्या माजी मुख्या ध्यापिका विशाखा ठमके यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन “छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, जय भवानी, जय शिवाजी, तुमच आमच नात काय जय जिजाऊ ! जय शिवराय! ” जयघोष करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.

कार्यक्रमात दहावी आणि बारावीत ७५ टक्के पेक्षा जास्त अंक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थांचा मोमेंटो आणि सम्मान पत्र देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी जीवन मुंगले व विशाखा ठमके यांनी शिवराज्या भिषेक दिवसावर उपस्थितांना मार्गदर्शन केले व विद्या र्थांचे कौतुक करुन त्यांना भविष्याचे मार्गदर्शन करुन शुभेच्छा दिल्या. शिवशंभु आखाड्याच्या खेळाडुंनी आपल्या कला, कौशल्यपुर्ण व विविध खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करुन उपस्थितांचे मन मोहित केले. एका महि न्यापुर्वी शिर्डीत पार पडलेल्या राज्यस्तरीय सिलंबम स्पर्धेत एकुण चार मेडल जिंकुन कन्हान शहराचे नाव लौकिक करणाऱ्या शिवशंभु आखाड्याचे कोच अनिकेत निमजे, जानवी पारधी, निधी नाईक, ऋतुजा वंजारी, हर्षल कोसरे यांना मोमेंटो आणि सम्मान पत्र देऊन सत्कार करण्यात आला. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

कार्यक्रमाचे सुत्र संचालन आणि आभार प्रदर्शन ऋषभ बावनकर यांनी केले. याप्रसंगी कन्हान ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष मोतीराम रहाटे, बिरेंद्र सिंह, निलकंठ मस्के, शैलेश शेळके, गज्जु गोरले, रिंकेश चवरे, अभिजीत चांदुरकर , सनोज पनिकर, आकाश पंडितकर, रोहित मानवटक र सह बहु संख्येने नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमा च्या यशस्वितेकरिता सकल हिंदु समाज कन्हान क्षेत्रा चे अध्यक्ष शुभम बावनकर, हिमांशु सावरकर, अनिकेत निमजे, ऋषभ बावनकर, हर्षल सावरकर, लोकेश दमाहे, चेतक पोटभरे, जीवन नांदुरकर, अजय पाली, मनीष इंगोले, शैलेश चकोले, सार्थक पोटभरे, आयुष संतापे सह सदस्यांनी सहकार्य केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

विना परवाना वाहतुक करणारा टाटा वाहन जप्त, आरोपी अटक

Sun Jun 8 , 2025
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कन्हान :- पोलीस स्टेशन अंतर्गत खंडाळा घटाटे कडुन कन्हान कडे अवैधरित्या चोरीच्या वाळुची वाहतुक करणाऱ्या टाटा कंपनीचा वाहनाला पोलीसांनी जप्त करुन कारवाईत एका आरोपीला ताब्यात घेऊन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. प्राप्त माहिती नुसार मंगळवार (दि.७) जुन रोजी दुपारी कन्हान पोलीस अवैध धंध्यावर कारवाई करणे कामी पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांचा मार्गदर्शनात आकाश सिरसाट, आतिश मानवटकर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!