वनसंरक्षक कार्यालयात शिवाजी महाराज यांची जयंती साजरी

गडचिरोली : रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती वनसंरक्षक गडचिरोली कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून साजरी करण्यात आली . याप्रसंगी उपस्थित कर्मचारी अधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. याप्रसंगी बावस्कर यांनी शिवाजी महाराजांच्या सैन्यांमध्ये सर्व धर्माचे सैनिक होते असे सांगितले . बिलोलीकर यांनी आपल्या भाषणामध्ये शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन आपण वनसंरक्षणाचे काम करावे असे सांगितले. कार्यक्रमचे अध्यक्ष डॉ.किशोर मानकर यांनी उपस्थितांना संबोधताना शिवाजी महाराजांचा धर्मनिरपेक्षपणा, 18 पगड जातींना जमवून उभारलेलं सैन्य, पर्यावरणा बाबत त्यांची दूरदृष्टी, रयतेचे कल्याण, स्त्रियांबद्दल आदर, गनिमी कावा इत्यादी बद्दल माहिती दिली. कार्यक्रमांमध्ये रायपुरे ,  प्रमोद मेश्राम, गुरुदास थेरकर , घोनमोडे, संदीप कांबळे नागोसे, व इतर कर्मचारी उपस्थित होते. राहुल काचमवार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

छत्रपती शिवाजी महाराज यांना जिल्हा प्रशासनाची आदरांजली

Mon Feb 20 , 2023
गडचिरोली : छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी समाधान शेंडगे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन केले. यानंतर राज्यगीताचे गायन करुन सांस्कृतीक कार्यक्रम, व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. यावेळी नायब तहसीलदार चिलमवार, नायब तहसीलदार एस बी धकाते ,जिल्हा नाझर आशिष सोरते, अव्वल कारकून विवेक दुधबळे, अव्वल कारकून पियुष आखाडे ,विठ्ठल चहांदे, आदी उपस्थित होते. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com