शाहीर कलाकारांच्या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करणार – शाहीर राजेंद्र बावनकुळे 

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

– मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री,सांस्कृतिक मंत्री यांना तहसीलदार मार्फत निवेदन सादर 

कामठी :- येत्या हिवाळी अधिवेशनापूर्वी शाहीर कलाकारांच्या मागण्या मान्य झाल्या नाही किंवा त्यावर शासनाने गांभीर्याने विचार केला नाही तर राज्यातील शाहीर कलाकार नागपूर येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान तीव्र आंदोलन करतील अशा इशारा भारतीय कलाकार शाहीर मंडळ ऑल इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष शाहीर राजेंद्र भीमराव बावनकुळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून दिला आहे. आज 9 नोव्हेंबर 2023 ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना कामठी तहसीलदार अक्षय पोयाम यांच्या मार्फत शिष्टमंडळाने निवेदन देण्यात आले.राज्यातील शाहीर कलाकार यांच्या मानधन वाढीसह सध्या 2250 रुपये मानधन सुरू आहे,इतर मागण्या शासन दरबारी अनेक वर्षापासून प्रलंबित आहे मागण्या पूर्ण करण्यात याव्या म्हणून गेल्यावर्षी 20 डिसेंबर 2022 रोजी नागपूर येथे हिवाळी अधिवेशना दरम्यान शाहीर कलाकार सर्व संस्थेच्या माध्यमातून भव्य मोर्चा विधान भवनावर काढण्यात आला होता. शाहीर कलाकार मोर्चा प्रश्नाबद्दल विधानसभेत आमदारांनी प्रश्न उपस्थित केले होते त्यावेळी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहाच्या उत्तर देताना सांगितले होते की सरकार सकारात्मक असून लवकरच योग्य ते निर्णय घेऊन प्रश्न मार्गी लावू पण बराच कालावधी होऊन गेला राज्य शासनाने शाहीर कलाकारांच्या प्रश्न मार्गी लावली नाही त्यामुळे राज्यातील शाहीर कलाकार यांच्या मनात तीव्र असंतोषाची भावना निर्माण झाली आहे.शाहीर कलाकार संस्थेची मागणी महाराष्ट्र शासन यांनी विशेष लक्ष देऊन पूर्ण करावी अशी आमची विनंती आहे. यावेळी शिष्टमंडळ मध्ये कवी ज्ञानेश्र्वर वांढरे,शाहीर नरहरी वासनिक,शा चीरकुट पुंडेकर,आरिफ जमाली, नत्थुजी चरडे, राजेंद्र नक्षणे,भगवान लांजेवार,सुधीर शंभरकर,घनश्याम पिंगळे, उर्मिला पुंडेकर, विमल वडे, अरूणा बावनकुळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

NewsToday24x7

Next Post

गोवर्धन पूजेनिमित्त रेड्याची मिरवणूक उत्साहात..

Tue Nov 14 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 14 :- भारत हा कृषिप्रधान आणि संस्कृती प्रधान देश आहे. या देशात प्रत्येक सन मोठ्या उत्साहाने साजरा केल्या जातो. होळी , पोळा , दिवाळी सारख्या सणांना या देशात एक महत्वाचे स्थान आहे यानुसार दिवाळी सनाचा दुसरा दिवस म्हणजे पाडवा .यानुसार दरवर्षी दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी पाडव्यानिमित्त गोवर्धन पूजा केली जाते या दिवशी रेड्याची मिरवणूक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com