कन्हान :- तेली समाज कन्हान-कांद्री व्दारे संताजी सभागृहातील संताजी मंदिर येथे संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती जल्लोषात साजरी करण्यात आली.
रविवार (दि.८) डिसेंबर ला संताजी मंदिर येथे संत संताजी जगनाडे महाराज यांचे विधीवत पूजा पतिराम देशमुख माजी अध्यक्ष, नरेश पोटभरे, लक्ष्मीकांत गिरडकर, रमेश हजारे, गणेश सरोदे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित गणमान्य मंडळींनी सुध्दा पुजन करुन माल्यार्पण केले. जय दुर्गा भजन मंडळ, संताजी नगर कांद्री यांचा भजनाचा कार्यक्रम गायक कवडु बारई, चंद्रशेखर बावनकुळे, शंकर सरोदे, चंद्रभान मंगळ, हिरालाल बेहुणे, मनोहर पेंटर, लता बावनकुळे, शोभा मंगळ, सुरेखा लंगडे,सुरेखा नागपुरे, जयश्री मरघडे आदीने सादर केला. भजन मंडळ प्रमुख कवडु बारई यांचे सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शरद डोणेकर, अशोक हिंगणकर, मनोहर कोल्हे, लक्ष्मीकांत गिरडकर, शेखर पाचे, सोनु कापसे आणि समस्त मंडळी प्रामुख्याने उपस्थित होते. आरती नंतर प्रसाद वाटप करून कार्यक्रमांची सांगता करण्यात आली.