– पैसे न दिल्यास नग्न अवस्थेत महिला रुग्णाला बाहेर आणणार स्वच्छता कर्मचाऱ्यांचा रुग्णांच्या नातेवाईकांवर दबाव
– अधिष्ठाता कडे तक्रार
यवतमाळ :- स्व.वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील प्रसुती विभागात मोठी लूट सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला असून गोरगरीब रुग्णांकडून रुग्णालयातील स्वच्छता कर्मचारी(मावशी) प्रसुती झालेल्या महिलेचे घाण कपडे धुतले असे सांगून 400 ते 500 रुपये घेत आहेत अशातच ज्या रुग्णांकडे पैसे नाहीत त्या रुग्णांना प्रसूती झाल्यानंतर नग्न अवस्थेत आणण्याचा दम सुद्धा येथील स्वच्छता कर्मचारी (मावशी) देत असल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे,या संपूर्ण प्रकाराबाबत रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर जतकर यांच्याकडे समाजसेविका चेतना राऊत यांनी लेखी तक्रार केली असून पैसे मागणाऱ्या स्वच्छता कर्मचारी (मावशी) वर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
स्व. वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात एका महिलेची प्रस्तुती झाली, प्रसुतीनंतर रुग्ण महिलेचे कपडे बदलविण्याकरिता स्वच्छता कामगार असलेल्या (मावशी) महिलेने रुग्णांच्या नातेवाईकांना 500 रुपयाची मागणी केली पैसे न दिल्यास महिला रुग्णाला नग्न अवस्थेत प्रसुती गृहाच्या बाहेर आणण्यातील असा दम सुद्धा दिल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे,अशातच घाबरलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी स्वच्छता कर्मचारी यांना 500 रुपये दिले, या संपूर्ण प्रकाराबाबत समाजसेविका चेतना राऊत यांनी स्व.वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश जतकर यांच्याकडे लेखी तक्रार दिली आहे या संबंधित महिला स्वच्छता कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सुद्धा तक्रारीतून करण्यात आली आहे, शासकीय रुग्णालयाने चौकशी समिती तयार केली मात्र शासकीय रुग्णालयातील चौकशी समिती संबंधित सफाई कर्मचारी (मावशी) यांच्यावर कारवाई करीत नसल्याचा आरोप समाजसेविका चेतना राऊत यांनी केला आहे.
*जिल्हा शासकीय रुग्णालयात यवतमाळ जिल्ह्यातून तसेच आजूबाजूच्या जिल्ह्यातून गोरगरीब रुग्ण हे उपचाराकरिता येथे येतात, अशातच मोठ्या प्रमाणात रुग्ण तसेच नातेवाईकांची गेल्या अनेक वर्षापासून शासकीय रुग्णालयात आर्थिक लूट होत आहे,नुकताच झालेला संपूर्ण झालेल्या संपूर्ण प्रकाराबाबत रुग्णालय प्रशासन जबाबदार असून रुग्णांची लूट हे प्रशासनाच्या सहमतीने गेल्या अनेक वर्षापासून होत असल्याचे समजते, या संपूर्ण प्रकाराला रुग्णालय प्रशासन जबाबदार असून रुग्ण तसेच नातेवाईकांची होणारी आर्थिक लूट प्रशासनाने त्वरित कारवाई करून थांबवावी अन्यथा हा संपूर्ण प्रकार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबई मंत्रालयातील दालनात ठिय्या आंदोलन करून मांडण्यात येईल – चेतना राऊत समाजसेविका*
*रुग्णालयातील स्वच्छता कर्मचारी (मावशी) 50 ते 100 रुपये मागतात मात्र हा संपूर्ण गैरप्रकार आहे, झालेल्या प्रकरणाची तक्रार रुग्णालय प्रशासनाकडे आली आहे याप्रकरणी प्रशासनाच्या वतीने चौकशी सुरू आहे, दोषींवर नक्कीच कारवाई करण्यात येईल – जिल्हा शासकीय रुग्णालय अधिष्ठाता डॉ. गिरीश जतकर*