माहिती अधिकार कायद्याची काटेकोर अंमलबजावणी व्हावी – कुलसचिव डॉ. तुषार देशमुख

– विद्यापीठात आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार कायद्यावर व्याख्यान संपन्न

अमरावती :- माहिती अधिकार कायद्याची काटेकोरपणे अंमबलजावणी व्हावी, असे प्रतिपादन कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांनी केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात गुरुवार दि. 28 सप्टेंबर, 2023 रोजी आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते, त्याप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. व्यासपीठावर विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर यांची उपस्थिती होती.

कुलसचिव पुढे म्हणाले, विद्यापीठात कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केल्या जाते. प्रथम अपिलीय अधिकारी म्हणून निर्णय देतांना अर्जदाराला न्याया देण्याचा माझा प्रयत्न असतो. विद्यापीठातील सर्वच माहिती अधिकारी कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करतात व नियमानुसार माहिती देतात. याप्रसंगी त्यांनी आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्यात.

माहितीचा अधिकार कायदा विषयावर व्याख्यान देतांना जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर यांनी माहितीची व्याख्या सखोल समजावून सांगितली. अर्जदाराने माहिती मागितल्यानंतर माहिती अधिका-याने नेमकी कुठली कार्यवाही करावी, माहिती देण्याचा प्रयत्न व्हावा, मोठया प्रमाणावर माहिती मागितली असल्यास कलम 7(9) ची स्पष्टता, पहिला मुद्दा ज्या माहिती अधिका-याशी संबंधित असेल त्याने करावयाची कार्यवाही, कलम 6 अन्वये करावयाची कार्यवाही आदींची माहिती दिली.

कलम 8 वर सखोल मार्गदर्शन करुन प्रत्येक उपकलमाचे महत्व पटवून दिले. वैयक्तीक माहिती असल्यास करावयाची कार्यवाही आदींबाबत स्पष्टता करण्यात आली. याशिवाय शासन परिपत्रक दि. 14 ऑक्टोबर, 2014 नुसार वैयक्तीक माहितीचा तपशिल, याबाबत सविस्तर मांडणी केली. प्रथम अपिलाबाबत करावयाची कार्यवाही, निर्णय लिहीतांना व पत्रव्यवहार करतांना घ्यावयाची दक्षता आदींची माहिती देऊन सहभागींनी विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली. माहिती अधिकार कायद्याचा नागरिकांना माहिती देण्यासाठी उपयोग करुन त्यांना माहिती पुरवावी. याशिवाय जे अर्जदार वारंवार माहिती मागत असल्यास त्यांच्याबाबत कायद्याच्या उद्देशिकेनुसार करावयाची कार्यवाही याबाबत मार्गदर्शन केले.

जनसंपर्क विभागातील माहिती अधिकार कक्षाच्या अधीक्षक सौ. रजनी चपाटे यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमामागील भूमिका स्पष्ट केली. संचालन व आभार जनसंपर्क विभागातील लघुलेखक श्री ओम जगताप यांनी केले. कार्यक्रमाला विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वेकोलि में राजभाषा पखवाड़ा संपन्न

Fri Sep 29 , 2023
– ‘क’ क्षेत्र में पाथाखेड़ा, ‘ख’ क्षेत्र में वणी पुरस्कृत – पखवाड़े के दौरान हरिशंकर परसाई की जन्मशती पर कार्यक्रम का आयोजन नागपूर :-14 सितम्बर 2023 से प्रारंभ राजभाषा हिंदी पखवाड़ा का आज 28 सितम्बर, 2023 को समापन हुआ। पुरस्कार वितरण एवं समापन समारोह में मुख्य अतिथि, अध्यक्ष-सह- प्रबंध निदेशक मनोज कुमार ने हिंदी में सर्वाधिक कार्य करने के लिए […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com