महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला मनपाच्या पावसाळ्यापूर्व नियोजन कार्याचा आढावा

नागपूर :- राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी (ता.७) मनपाच्या पावसाळ्यापूर्व नियोजनासह अतिवृष्टीमुळे क्षतिग्रस्त झालेल्या नदी/नाल्यांच्या सुरक्षा भिंतीच्या व क्षतिग्रस्त झालेल्या रस्त्यांच्या कामांचा आढावा घेतला. पावसाळापूर्वी आपत्ती व्यवस्थापनाच्या संदर्भात आढावा घेण्यासाठी पुढील आठवड्यात मनपा आयुक्तांनी आमदार व माजी नगरसेवकांसोबत झोननिहाय बैठक घेऊन अहवाल तयार करावा, असे निर्देश यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हाधिकारी सभा कक्षात झालेल्या आढावा बैठकीत खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार अभिजीत वंजारी आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रवीण दटके, माजी आमदार सुधाकर कोहळे, मनपाचे मुख्य अभियंता मनोज तालेवार, माजी नगरसेवक नरेंद्र (बाल्या) बोरकर, कार्यकारी अभियंता रवींद्र बुंदाडे, सचिन रक्षमवार, विजय गुरुबक्षांनी,अश्विनी एलचटवार, गेडाम यांच्यासह उपअभियंता आदी अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मनपाद्वारे शहरात सुरू असलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी. कामांमुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देश दिले. याशिवाय मंत्रीमहोदयांनी क्षतिग्रस्त नदी/नाल्यांच्या सुरक्षा भिंतीच्या बांधकामाचा आणि क्षतिग्रस्त रस्त्यांच्या कामांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी प्रगतीपथावरील कामांची गती वाढविण्याचे ही निर्देश दिले. आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत असलेली उर्वरित कामे करण्याकरिता वाढीव निधीचा अतिरीक्त प्रस्ताव महानगरपालिकेने राज्य सरकारकडे पाठवाव, असे निर्देश यावेळी पालकमंत्री बावनकुळे यांनी दिले. बैठकीत आमदारांनी आपल्या मतदार संघातील विविध कामांची माहिती जाणून घेतली.

बैठकीत सर्वप्रथम पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यापुढे मनपाद्वारे करण्यात आलेल्या विविध कामाचे सादरीकरण करण्यात आले. याद्वारे अतिवृष्टीमुळे क्षतिग्रस्त झालेल्या ५६ नदी/नाल्यांच्या सुरक्षा भिंतीचे बांधकाम आणि क्षतिग्रस्त झालेल्या ४१ रस्त्यांच्या कामांसाठी मंजूर २०४.७१ कोटी निधीची माहिती देण्यात आली. यात क्षतिग्रस्त नदी/नाल्यांच्या सुरक्षा भिंतीची मनपाच्या दहाही झोनमध्ये एकूण ५६ कामे केली जाणार आहे. यात ८९५३ मीटर लांबीच्या कामाचा समावेश आहे.

याकरिता १६३.२३ कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. याद्वारे ५० कामे पूर्ण करण्यात आली असून, ५ कामे प्रगतीपथावर असल्याचे सांगण्यात आले. तर दहाही झोन मध्ये एकूण ४१ क्षतिग्रस्त रस्त्यांची कामे केली जात आहेत. यात ४७६८० मीटर लांबीची कामे केली जाणार आहे. याकरिता ३३.७४ कोटी रुपये निधी मंजूर झाला आले. याद्वारे ४० कामे पूर्ण करण्यात आली असून, १ काम प्रगतीपथावर असल्याचे सादरीकरणाद्वारे सांगण्यात आले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

कुशीनारा बुद्ध विहारात भिक्खू संघाची बैठक

Sun Jun 8 , 2025
– महाबोधी सहित विविध विषयावर चर्चा नागपूर :- अखिल भारतीय भिक्खू संघाचे विदर्भ प्रदेशचे अध्यक्ष भंते प्रियदर्शी महाथेरो यांच्या अध्यक्षतेखाली न्यू कैलास नगरातील कुशीनारा बुद्ध विहार परिसरात भिक्खू संघाच्या बैठकी चे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन, भिक्खू संघाची भूमिका, नागपुरातील विविध विहारांच्या समस्या, भिक्खूंच्या समस्या, भिक्खू व उपासक यांचा समन्वय आदी विषयावर चर्चा करण्यात आल्या. या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!