प्रजासत्ताक दिनानिमित्त विधान भवनात ध्वजारोहण

मुंबई, दि. 26 : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त विधान भवन, मुंबई येथे आज विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. श्रीमती नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते व विधानसभेचे उपाध्यक्ष श्री.नरहरी झिरवाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले.

याप्रसंगी विधानपरिषदेच्या माजी सदस्या श्रीमती विद्या चव्हाण तसेच विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव श्री.राजेन्द्र भागवत, सह सचिव तथा विशेष कार्य अधिकारी डॉ.अनिल महाजन, उप सचिव श्री.शिवदर्शन साठये, श्री.राजेश तारवी, सभापतींचे सचिव श्री.महेंद्र काज, अवर सचिव श्री.रविंद्र जगदाळे,  वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्र संचालक आणि जनसंपर्क अधिकारी श्री.निलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. विधानमंडळाचे मुख्य सुरक्षा अधिकारी श्री.प्रदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने यावेळी मानवंदना दिली.

या प्रसंगी महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती श्री.रामराजे नाईक-निंबाळकर यांचा प्रजासत्ताक दिनानिमित्तचा संदेश विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. श्रीमती नीलम गोऱ्हे यांनी वाचून दाखविला.
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

कोरोना विरूध्दच्या लढ्यात शासनाच्या प्रयत्नांना जनतेनी साथ द्यावी - पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम

Wed Jan 26 , 2022
– लसीकरणाच्या उत्तम कामासाठी प्रशासन व आरोग्य यंत्रणेचे पालकमंत्र्यांकडून कौतुक – भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 72 वा वर्धापन दिन उत्साहात भंडारा, दि. 26 :  मुंबई, पुण्यानंतर लसीकरण झालेला जिल्हा म्हणून राज्यात भंडाऱ्याने उल्लेखनिय कामगिरी केली आहे. डिसेंबर अखेर राबविलेली विशेष लसीकरण मोहीम मिशन लेफ्ट आऊटची केलेली कामगिरी नक्कीच प्रशंसनिय असल्याचे पालकमंत्री डॉ. कदम म्हणाले. लसीकरणाच्या कामासाठी प्रशासन व आरोग्य यंत्रणेचे पालकमंत्र्यांनी कौतुक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com