संदीप कांबळे, कामठी
कामठी ता प्र 3: –समता ,त्याग,बंधुता आणि पावित्र्याचे पर्व मानले जाणारे रमजान पर्वनिमित्त कामठी तालुक्यात रमजान ईद सर्वत्र मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आले.यानिमित्त कामठी येथील रब्बानी ईदगाह येथे सकाळी साडे आठ तसेच गिरीजाघर ईदगाह येथे सकाळी 9.30 वाजता मौलाना यांच्या प्रमुख उपस्थितीत नमाज पठन केल्यानंतर एकमेकांना रमजान ईद च्या शुभेच्छा दिल्या तसेच शहरातील 30 मशजीद मध्ये नमाज पठण करून एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या.
गिरीजाघर ईदगाह येथे नमाज पठन झाल्यानंतर समस्त मुस्लिम बांधवाना।नागपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व विधानपरिषद सदस्य आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार टेकचंद सावरकर, माजी राज्यमंत्री ऍड.सुलेखाताई कुंभारे, खासदार कृपाल तुमाणे, माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर यांच्या शुभ हस्ते गुलाबपुष्प देऊन ईद च्या शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी माजी राज्यमंत्री ऍड सुलेखाताई कुंभारे यांनी मार्गदर्शनात प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांनी दिलेली सत्यभाषण सद्विचार,सदाचार,शांतता,समता, आणि बंधुत्वाची शिकवण आपल्याला विकासाच्या दिशेने घेऊन जात असल्याचे सांगितले तर रमजानच्या पवित्र महिना आणि त्यांनंतर येणारी ईद सकारात्मक विचारांना चालना देणारी असल्याचे मत व्यक्त केले.यावेळी माजी नगराध्यक्ष मायाताई चवरे, माजी नगराध्यक्ष गुड्डू मांनवटकर, नगरसेवक नीरज लोणारे,रेखा भावे,माजी नगरसेवक श्रावण केळझरकर, माजी नगरसेवक दीपक सीरिया, माजी नगरसेवक कपिल गायधने, उज्वल रायबोले, लाला खंडेलवाल, विजय कोंडुलवार, पमनानी, अश्फाक कुरेशी, नियाज अहमद, इकबाल कुरेशी आदी उपस्थित होते.
या पर्वादरम्यान कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात राहून बंधुभावाने हा पर्व साजरे व्हावे यासाठी पोलीस विभागातर्फे जागोजागी चोख बंदोबस्त लावण्यात आला होता.
कामठी येथे रमजान ईद उत्साहाने साजरी
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com