अमरावती :- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ व श्री व्यंकटेश कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, देऊळगाव राजा, जि. बुलढाणा यांचे संयुक्त विद्यमाने कुलपती तथा महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांचेकडून प्राप्त झालेल्या दाननिधीमधून ‘राजमाता जिजाऊ’ व्याख्यानमालेचे शनिवार, दि. 30 सप्टेंबर, 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता मातृतीर्थ जिजाऊसृष्टी सिंदखेड राजा, जि. बुलढाणा याठिकाणी आयोजन करण्यात आले आहे.
व्याख्यानमालेचे अध्यक्षस्थान विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ. प्रमोद येवले भूषविणार असून ‘समाज व राष्ट्र उभारणीत राजमाता जिजाऊचे योगदान’ या विषयावर मराठा सेवा संघ, औरंगाबादचे महासचिव डॉ. चंद्रशेखर शिखरे हे सन्माननीय वक्ते म्हणून अभ्यासपूर्ण व्याख्यान देतील. याप्रसंगी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगांवकर व श्री बालाजी महाराज संस्थान, देऊळगाव राजा, जि. बुलढाणाचे वंशपारंपारिक विशस्त राजे विजयसिंह मानसिंगराव जाधव यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभणार आहे.
तरी व्याख्यानमालेचा सर्व नागरिकांनी व विद्याथ्र्यांनी जास्तीतजास्त लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत पाटील व श्री व्यंकटेश कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ज्ञानेश्रवर मोरे यांनी केले आहे.