विनयभंग करणाऱ्या आरोपीला कोर्टातून शिक्षा

देवलापार :- येथील फिर्यादी यांच्या रिपोर्ट वरुन पो.स्टे. देवलापार येथे अप. क्र. १४४/२१ कलम ३५४(अ) भादवि सहकलम ८, १२ पोक्सो कायद्यान्वये गुन्हा नोंद झालेला होता. यातील फिर्यादी व आरोपी पुरूषोत्तम बाबुलाल कोकोडे, वय ३५ वर्ष, रा. जुनेवाडी देवलापार हे एकाच गावात आजुबाजुला राहत होते. यातील आरोपीने फिर्यादीच्या अल्पवयीन पिडीत मुलीला आधारकार्ड काढण्याकरीता घेवुन गेला व परत येताना आरोपीने स्वतःच्या शेतात पिडीतेला नेवुन तिला लज्जा येईल असे बोलून पिडीतेचा विनयभंग केला.

सदर प्रकरणाचे तपास सहायक पोलीस निरीक्षक निशा भुते यांनी करून सदर प्रकरण न्याय प्रविष्ठाकरीता मा.कोर्टामध्ये सादर केले. आज दिनांक १२/०७/२०२३ रोजी मा. कोर्ट विद्यमान न्यायाधीश एक्स्ट्रा डी. जे. पांडे नागपूर यांनी वरील नमुद आरोपीस कलम ८ पोक्सो मध्ये ०३ वर्ष सश्रम कारावास व ५०००/- रु. दंड, दंड न भरल्यास ३ महिने सश्रम कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे.

सरकारचे वतीने एपीपी परसोड़कर यांनी काम पाहीले. कोर्ट कामात पैरवी अंमलदार म्हणुन पोलीस हवालदार रणजित जाधव पोस्टे देवलापार यांनी मदत केली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल 

Thu Jul 13 , 2023
मौदा :- अंतर्गत १७ किमी अंतरावर दहेगाव येथे दिनांक ०१/०४/२०२३ ते २३/०५/२०२३ ००.०० वा. दरम्यान फिर्यादी रूपाली अमोल आंबीलडूके, वय २३ वर्ष रा. दहेगाव व आरोपी १) अमोल पूरनलाल आंबीलडूके हे पती पत्नी असून दिनांक १०/०३/२०२३ रोजी रितीरिवाजाने लग्न झाले असून लग्ना पासून पती १५ दिवस चांगले राहीले नंतर तू नातेवाईका सोबत बोलायचे नाही असे म्हणून शुल्लक कारणावरुन वादविवाद करीत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com