संत भोजाजी महाराज देवस्थानच्या पर्यटनस्थळाचा दर्जा उन्नतीसाठी प्रस्ताव करावा- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई :- विदर्भाची पंढरी समजले जाणाऱ्या संत भोजाजी महाराज देवस्थानच्या पर्यटनस्थळाचा ‘ब’ दर्जा उन्नतीसाठी प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील समिती कक्षामध्ये संत भोजाजी महाराज देवस्थान विकास आराखडा मंजुरी व पर्यटन स्थळाच्या दर्जाबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार समीर कुणावार, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले आदी उपस्थित होते.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, या पर्यटन स्थळाची ‘क’ दर्जावरुन दर्जा उन्नती झाल्यानंतर पर्यटन विकास निधीत वाढ होऊ शकेल. यामुळे या ठिकाणच्या विकासकामांना अधिक चालना मिळणार आहे. यासाठी पर्यटन स्थळाच्या दर्जा उन्नती करिता राज्य शासनास प्रस्ताव सादर करावा, असे त्यांनी यावेळी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

राज्यातील सैनिकी शाळांच्या शैक्षणिक सुधारणांसाठी राज्यस्तरीय समिती गठीत करावी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

Thu May 15 , 2025
मुंबई :- राज्यातील जास्तीत-जास्त विद्यार्थी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) मध्ये सहभागी व्हावेत आणि शिस्तप्रिय, आत्मविश्वास असलेला, सांघिकवृत्ती जोपासणारा, नेतृत्वाभिमुख विद्यार्थी तयार करण्याच्या दृष्टीकोनातून सैनिकी शाळांचे धोरण जाहीर केले आहे. यामध्ये सुधारणा करण्याची मागणी शाळांकडून होत असून या मागण्यांच्या अनुषंगाने आणि शैक्षणिक दर्जा उंचाविण्यासाठी राज्यस्तरीय समिती गठीत करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!