महसूल पंधरावडा निमित्त ‘स्वच्छ सुंदर माझे कार्यालयासाठी’ अधिकारी-कर्मचाऱ्यांचे सरसावले हात

▪जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी घेतला सहभाग

नागपूर :- राज्यात दि. 1 ते 15 ऑगस्टपर्यंत सर्वत्र साजरा केल्या जाणाऱ्या महसूल पंधरवाडा निमित्त जिल्हाधिकारी कार्यालय व परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्वच्छ सुंदर माझे कार्यालय’ कार्यक्रमाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा प्रशासनाचे वतीने करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील स्वच्छता उपक्रमात अतिरिक्त जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे, उपजिल्हाधिकारी सर्वश्री पियुष चिवंडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रविण महिरे, दिपमाला चवरे, संजय गिरी, मयुर ठेकेदार, रोहित ठाकरे, चंद्रकांत दुधपचारे व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. जिल्ह्यातील सर्व उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालये येथेही ‘स्वच्छ सुंदर माझे कार्यालय’ उपमक्रम राबविण्यात आला.

‘स्वच्छ सुंदर माझे कार्यालय’ उपक्रम राबविण्यात आला.

शासनाने घोषीत केलेल्या विविध महत्त्वाकांक्षी योजना या पंधरवड्यात जनतेपर्यंत पोहोचवून त्यांच्या मनातील शंका दूर केल्या जाणार आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री तिर्थदर्शन योजना अशा विविध योजनांची माहिती व लाभ सर्वसामान्य जनेतेपर्यंत पोहोचविला जात आहे.

1 ते 15 ऑगस्ट असणाऱ्या महसूल सप्ताहात 1 ऑगस्टला महसूल सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभार्थ्यांकडून अर्ज भरुन घेण्यात आले. 2 ऑगस्टला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करुन चित्रफित व छायाचित्र तसेच सादरीकरण करण्यात आले. 3 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचे सादरीकरण करण्यात आले. 4 ऑगस्टला स्वच्छ व सुदर माझे कार्यालय अंतर्गत विशेष मोहिम राबवून जिल्हा, तालुका, मंडळ व ग्रामस्तरावर कार्यालय व परिसराची साफसफाई करण्यात आली. सोबतच कार्यालय अभिलेख व दस्तऐवजांचे वर्गीकरण व्यवस्थापन निंदणीकरण व महत्वाच्या दस्ताऐवजांचे स्कॅनिंग व संगणीकरण करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली.

पुढील कालावधीत म्हणजेच 5 ऑगस्टला ‘कृषी मार्गदर्शन कार्यक्रम’ होणार असून 6 ऑगस्टला ‘शेती, पाऊस आणि दाखले’ याबाबत सादरीकरण होणार आहे. 7 ऑगस्टला ‘युवा संवाद कार्यक्रम’ होणार असून 8 ऑगस्टला ‘महसूल – जनसंवाद कार्यक्रम’ तर 9 ऑगस्टला ‘महसूल ई-प्रणाली कार्यक्रम’ होणार आहे. 10 ऑगस्टला जिल्हा सैनिक कल्याण विभागाचा ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ कार्यक्रमाचे आयोजन होणार आहे. 11 ऑगस्टला ‘आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन कार्यक्रमाचे’ आयोजन होणार आहे. 12 ऑगस्टला समाज कल्याण विभागाचा ‘एक हात मदतीचा – दिव्यांगांच्या कल्याणाचा’ कार्यक्रम होणार असून 13 ऑगस्टला महसूल अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी ‘संवाद व प्रशिक्षण’ होणार आहे. 14 ऑगस्टला ‘महसूल पंधरवाडा वार्तालाप’ कार्यक्रमाचे आयोजन होणार असून 15 ऑगस्टला महसूल संवर्गातील कार्यरत, सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी संवाद मध्ये ‘उत्कृष्ट अधिकारी व कर्मचारी पुरस्कार वितरण व महसूल सप्ताह’ची सांगता होणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नामांतर आंदोलनातील शहिदांना भाजपातर्फे अभिवादन

Mon Aug 5 , 2024
नागपूर :- औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनातील शहिदांना रविवारी ४ ऑगस्ट रोजी भारतीय जनता पार्टीतर्फे अभिवादन करण्यात आले. कामठी रोडवरील दहा नंबर पूल चौक इंदोरा येथील नामांतर शहीद स्मारकस्थळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी पुष्प अर्पण करून शहिदांना अभिवादन केले. याप्रसंगी अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष सतीश सिरसवान, संघपाल मेश्राम, गोपाल शेंडे, ज्योती शेंद्रे, किशोर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com