नागपूर :- विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली आज आयुक्तालयात विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यात एकही प्रकरण प्राप्त झाले नाही व यापुर्वीच्या लोकशाही दिनातील कोणतेही प्रकरण प्रलंबित नाही.
विभागीय आयुक्तालयात आयोजित लोकशाही दिनात अपर आयुक्त (सामान्य प्रशासन) तेजुसिंग पवार, शहर व ग्रामीण पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी, नागपूर सुधार प्रन्यास, महानगरपालिका, आदिवासी विकास विभाग, वस्तू व सेवा कर, कामगार विभाग, जिल्हा परिषद, अपर राज्यकर आयुक्त, मुख्य वनरसंक्षक आदि विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
150 दिवसांच्या सेवा विषयक सुधारणा कार्यक्रमासाठी दिल्या सूचना
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमांतर्गत नागपूर विभागातील विविध शासकीय कार्यालयांनी केलेल्या उत्तम कामगिरीसाठी बिदरी यांनी उपस्थित विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
6 मे ते 2 ऑक्टोंबर 2025 दरम्यान, राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांसाठी 150 दिवसांचा सेवा विषयक सुधारणा कार्यक्रम आखण्यात आला असून यातंर्गत ईज ऑफ लिव्हिंग, ईज ऑफ डुईंग बिझनेस, ई -ऑफीस, डॅशबोर्ड आदी माध्यमातून द्यावयाच्या सेवांबद्दल श्रीमती बिदरी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या स्पर्धेचा निकाल 2 ऑक्टोंबर 2025 रोजी जाहीर होणार आहे.