बुद्धं शरणं गच्छामि‌’च्या स्वरात निनादला श्रामणेर सोहळा

– 28 बालकांना श्रामणेर दीक्षा

– दीक्षाभूमीवर तीन दिवसीय बुद्ध महोत्सव

– भदन्त ससाई यांच्याकडून त्रिशरणासह दशशील ग्रहण

नागपूर :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती आणि बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर बुद्धिस्ट सेमिनरी उंटखाना यांच्या संयुक्त विद्यमाने दीक्षाभूमी येथे (2 हजार 569 वी बुद्ध जयंती) तीन दिवसीय बुद्ध महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष तथा धम्म सेना नायक भदन्त आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या हस्ते 28 बालकांना श्रामणेरची दीक्षा दिली.

दीक्षाभूमीच्या प्रांगणात लहान लहान बालक डोक्यावरचे केस काढून पालकांसह उपस्थित झाले. श्रामणेरची दीक्षा घेण्यासाठी सर्व बालक रांगेनी बसले. परिसरातच पालक बसले होते. सुरुवातीला भदन्त ससाई यांनी उपस्थित बालकांना श्रामनेर प्रतिज्ञा दिली. यावेळी पालकांचा आशिर्वाद घेतल्यानंतर बालकांनी भिक्खुचेही आशीर्वाद घेतले. अंगावर काशाय वस्त्र धारण केल्यानंतर त्रिशरणासह दशशील भदन्त ससाई यांच्याकडून ग्रहण केले. सोबतच आयुष्यभर दहा शीलांचे पालन करण्याचे व्रत त्यांनी घेतले. यावेळी ससाई यांनी श्रामणेरांना चिवरचे महत्व सांगितले. आता तुम्ही बुध्दाचे शिष्य झालात, यापुढे तुम्हाला तथागताने सांगितलेल्या मार्गाचे अनुसरण करायचे आहे.

काशाय वस्त्रधारी श्रामनेर सोहळा ‌‘बुद्धं शरणं गच्छामि‌’च्या स्वरात निनादला. उंटखाना येथील बुद्धिस्ट सेमिनरीत श्रामणेरांना निवासी प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले. या शिबिरादरम्यान भिक्खू संघ पाच दिवस बुद्ध, धम्म आणि संघ याविषयी मार्गदर्शन करतील. याप्रसंगी दीक्षाभूमी स्मारक समितीचे विलास गजघाटे, बुद्धिस्ट सेमिनरीचे प्रमुख दीक्षागुरू धम्मसारथी, भंते नागसेन, भ्ांते धम्मविजय, भंते धम्म प्रकाश, भंते संघ, भंते राहुल, भंते बुध्दघोष, भ्ांते राहुल बोध्ाी, भिक्खुनी संघप्रीया, भिक्खुनी शीलाचारा उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धम्मसेनेचे रवी मेंढे यांच्यासह भिक्खू, भिक्खुनी संघ, उपासक उपासिकांनी सहकार्य केल.

समारंभ थाटात साजरा करावा

यावेळी ससाई यांनी श्रामणेरांना मार्गदर्शन केले. गृहस्थ जीवनात प्रवेश करणारा समारंभ जसा थाटात साजरा केला जातो. शुभेच्छांचा वर्षाव करतात. अगदी त्याच प्रमाणे श्रामणेर हा सुध्दा एक समारंभच आहे. पालकांनी एखाद्या उत्सवाप्रमाणे थाटात समारंभ साजरा करावा, असेही भदन्त ससाई म्हणाले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

......अखेर बोरीघिवारी येथील पथदीप झाले सुरू, मात्र नवीन लावलेली दुसरी डीपीही जळाल्याने पाणी समस्या कायमच !

Tue May 13 , 2025
अरोली :- येथून जवळच असणाऱ्या बोरीघिवारी येथील पथदीप मागील आठ ते दहा दिवसापासून बंद होते, याबाबत त्यादिवशी गावात नसलेल्या सरपंच विशाल सेलोकर यांना 10 मे शनिवारी रात्री साडेनऊ वाजता दरम्यान भ्रमणध्वनीवरून ही समस्या सांगताच त्यांनी लगेच दखल घेतली असून, ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने रात्री दहा दरम्यान ते पथदीप सुरू केल्याचे येथील एका सामाजिक कार्यकर्त्याने नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवरून भ्रमणध्वनीवरून सांगितले. ते […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!