– खैरे कुणबी समाजाचे पहिलेच अधिवेशन नागपुरात संपन्न
– राष्ट्रीय खैरे कुणबी समाजाच्या कार्यकारणीत गुणेश्वर आरिकर यांची अध्यक्षपदी निवड
नागपूर :- विदर्भ खैरे कुणबी समाज संघटनेचे पहिले महाअधिवेशन नागपूर येथे ११ मे २०२५ रोजी नुकतेच संपन्न झाले. या महाअधिवेशनात तीन वर्षाच्या कालावधीसाठी राष्ट्रीय खैरे कुणबी संघटनेची देश पातळीवरील राष्ट्रीय कार्यकारिणी सर्वानुमते घोषित करण्यात आली. गुणेश्वर आरीकर राष्ट्रीय अध्यक्ष नागपूर, राजेश ठाकरे राष्ट्रीय महासचिव रामटेक, श्याम लेडे राष्ट्रीय उपाध्यक्ष चंद्रपूर, प्रा.शेषराव येलेकर राष्ट्रीय कार्याध्यक्ष गडचिरोली, शिवशंकर मुंघाटे राष्ट्रीय कोषाध्यक्ष भंडारा, रत्नदीप म्हशाखेत्री राष्ट्रीय सहकार्याध्यक्ष गडचिरोली, अशोक मस्के राष्ट्रीय सह कोषाध्यक्ष अकोला, रवींद्र निरगुडे राष्ट्रीय चिटणीस बुलढाणा, बाबाराव भोयर राष्ट्रीय सह चिटणीस वर्धा, विनायकराव कुकडे राष्ट्रीय सहसचिव गोंदिया, लक्ष्मणराव घोटेकर राष्ट्रीय समन्वयक यवतमाळ, शाहू भोयर राष्ट्रीय संघटक अमरावती, सतीश देशमुख राष्ट्रीय संघटक वाशिम, राष्ट्रीय ज्येष्ठ सल्लागार देवराव रडके माजी आमदार कामठी, सुभाषराव धोटे माजी आमदार राजुरा, अशोकराव शिंदे माजी आमदार हिंगणघाट, करण देवतळे आमदार वरोरा, प्रा. ज्ञानेश वाकुडकर साहित्यिक नागपूर, डॉ. विजयराव देवतळे चंद्रपूर, अरुण डोंगरे माजी जिल्हाधिकारी, चिंतामणराव डहाळकर माजी उपजिल्हाधिकारी, दिगंबरराव गुरपूडे माजी उपाध्यक्ष जि.प.चंद्रपूर, प्रशांत वाघरे सामाजिक कार्यकर्ता गडचिरोली, डॉ अनिल चिताळे माजी कुलसचिव गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, रत्नमाला भोयर माजी नगराध्यक्ष मुल, याप्रमाणे कार्यकारणी घोषित करण्यात आली.
केंद्रीय कार्यकारिणीची निवड झाल्यानंतर गुणेश्वर आरीकर राष्ट्रीय अध्यक्ष खैरे कुणबी समाज संघटना यांचे व नवनिर्वाचित कार्यकारणीचे उपस्थित समाज बांधवाकडून स्वागत करण्यात आले. खैरे कुणबी समाज संघटित व्हावा, जिल्हाजिल्हात वेगवेगळ्या नावाच्या समाज संघटना असू नये, म्हणून सभेत सर्वांनुमते संपूर्ण जिल्ह्यात व तालुक्यात एकच नावाच्या राष्ट्रीय खैरे कुणबी संघटना याच नावाच्या शाखा तयार करण्यात याव्यात असे ठरले. विदर्भातील जेष्ठ नागरिक, सचिव, अध्यक्ष यांना शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार व एक झाड देऊन सत्कार केला.गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संविधानाच्या पुस्तिका वाटण्यात आल्या व तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीता सुद्धा वाटण्यात आल्या तसेच विद्यार्थ्यांचा सत्कार व विद्यार्थ्यांना नोटबुके वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुणेश्वर आरिकर यांनी केले तर संचालन प्रतीक्षा भास्कर थुटे आणि आभार विजया धोटे यांनी मानले. समाजातील मोठया संख्येने खैरे कुणबी बंधू भगिनी सहभागी झाले होते.