– उत्तरप्रदेश येथुन मोठ्या प्रमाणात सिम कार्ड व मोबाईल जप्त
नागपूर :- फिर्यादी संध्या प्रणय वानखेडे हिने तिचे मोबाईलवर आलेले लिंक ओपन करून दि. ११/१२/२०२३ रोजी SEQUOIA या अॅप्लीकेशनद्वारे ट्रेडींग अकाउंट ओपन करून त्यामध्ये नेट बँकिंगद्वारे विवीध तारखेला एकुण ११,४०,०००/- रूपये जमा करून शेयर मध्ये गुंतवणुक केली. दि. ३१/१२/२०२३ रोजी फिर्यादीस फायदा झाल्याचे दिसुन येताच फिर्यादीस झालेली फायदयाची रक्कम विड्रॉल करत असता विड्रॉल झाली नाही म्हणून YHB Master Your own Destiny व्हॉट्सअप ग्रुपवर माहीती टाकली परंतु समाधान न झालेवरून फसवणुक झाल्याचे लक्षात आल्याने फिर्यादीचे रीपोर्ट वरून पोलीस ठाणे काटोल अप. क्र. १८२/२४ कलम ४२० भादवि सहकलम ६६ (डी) माहीती तंत्रज्ञान अधिनियम अन्वये गुन्हा नोंद केला होता.
सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन नागपूर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक हर्ष ए. पोद्दार यांचे आदेशाने सदर गुन्हयाचा तपास सायबर सेलकडे वर्ग करण्यात आला होता. सायबर सेल व स्थानिक गुन्हे शाखेचे संयुक्त पथक तयार करण्यात आले. वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार पथक आरोपींचा शोध घेत असता तांत्रिकरीत्या आरोपी हे उत्तरप्रदेश राज्यातील हरदोई जिल्हयातील असल्याचे प्राथमिक माहिती प्राप्त करून वरीष्ठांच्या परवानगीने पथकाने आरोपीचे राहते घरी रेड केली असता दोन्ही आरोपी नामे १) मोहम्मद सफीक रहीम बक्स, वय २५ वर्ष, रा. घर क. ४०६ वार्ड क. ०८ गाव टंडीयावा पोलीस ठाणे ठंडीयावा जि. हरदोई उ. प्र. असे सांगुन त्याचे गावातच सिम कार्ड विकीचे दुकान असल्याचे सांगीतले व दुस-याने आपले नाव आशिष कुमार राजाराम, वय २५ वर्ष, रा. सिकंदरपुर, पोलीस ठाणे टंडीयावा जि. हरदोई उ.प्र. यांना कायदेशीररीत्या ताब्यात घेतले. दोन्ही आरोपींनी सदर गुन्हयाची कबुली दिल्याने आरोपींचे ताब्यातुन Vi कंपनिचे पॅकेट मध्ये असलेले वापरलेले एकुण १७८० नग सिम कार्ड व Jio कंपनिचे पॅकेटमध्ये वापरलेले एकुण ४१४ नग सिम कार्ड तसेब खाकी रंगाचे छोटे पॅकेट मध्ये असलेले वापरलेले एकुण ४३२ नग सिम कार्ड असे एकुण २,६२६ नग सिम कार्ड किंमती २,६२,६००/-रू, एकूण ४० नग विविध कंपनिये साधे तसेच अॅन्ड्रॉईड मोबाईल किंमती १,३१,०००/-रू, Jio कंपनिचे डोंगल किंमती १,५००/-रू, इलेक्ट्रीक सॉकेट बोर्ड, चार्जर, विविध बँकेचे पासबुक असा एकुण ३,९५,७००/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधिक्षक रमेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेलचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर चकाटे, सहायक पोलीस निरीक्षक आशिषसिंह ठाकुर, पोलीस उपनिरीक्षक भारत थिटे, पोहवा/२१०३ रोहन डाखोरे, पोहवा वर्षा खंडाईत, नापोशि संगिता, पोलीस नायक अमृत किनगे, नापोशि ममता सरोदे, नापोशि सतिश राठोड, पोशि मृणाल राउत, मनिश नेवारे यांनी पार पाडली.