जी-20 परिषदेसाठी नागपूर सज्ज होत आहे, शहरात ठिकठिकाणी झळकत आहेत सहभागी देशांचे ध्वज 

नागपूर :- येत्या आठवड्यात आयोजित होणाऱ्या जी-20 या जागतिक परिषदेसाठी नागपूर शहर सज्ज होत आहे. शहराच्या सिव्हिल लाईन्स व लगतच्या परिसरात ठिकठिकाणी जी-20 परिषदेच्या सदस्य देशांचे ध्वज व या देशांचे स्वागत करणार आहेत.

महत्वाचे शासकीय कार्यालये असणाऱ्या सिव्हिल लाईन्स परिसरात सौदर्यीकरणाचे विविध कामे अंतिम टप्प्यात आहेत. जी-20 परिषदेच्या सदस्य देशांच्या ध्वजांनी या परिसरास वेगळेच सौंदर्य प्राप्त झाले आहे. रस्त्याच्या दुभाजकावर स्थित पथदिव्यांच्या खाबांवर हे ध्वज तसेच नागपुरात सी-20 परिषदेच्या प्रतिनिधींचे स्वागत करणारे ध्वज लावण्यात आले आहेत.        जीपीओ चौकापासून देवगिरी चौक, भोले पेट्रोलपंप, उच्च न्यायालय आणि विधानभवनाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुभाजकांवर लावण्यात आलेले हे ध्वज पादचारी आणि वाहनाने ये-जा करणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. जीपीओ आणि विधानभवन चौकात उभारण्यात आलेले आकर्षक ग्लोसाईन बोर्डही आकर्षणाचा विषय ठरले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कठीण परिश्रमातून स्वतःला सिद्ध करा - डॉ. कवीरायनी इंदिरा प्रियदर्शनी यांचे प्रतिपादन

Tue Mar 14 , 2023
-जागतिक महिला दिनानिमित्ताने विद्यापीठात राष्ट्रीय परिषद नागपूर :-घरासोबतच कार्यालयाची जबाबदारी देखील महिला सांभाळत आहे. महिलांना सर्वच क्षेत्रात संधी मिळत आहे. त्यामुळे महिला म्हणून कठीण परिश्रमातून स्वतःला सिद्ध करा, असे प्रतिपादन बार्क रसायनशास्त्र विभागाच्या माजी प्रमुख, मुंबई विद्यापीठाच्या यूएम-डीएई सेंटर फॉर एक्सलन्स इन बेसिक सायन्सच्या ‌‌ प्रोफेसर डॉ. कवीरायनी इंदिरा प्रियदर्शनी यांनी केले. आंतरराष्ट्रीय महिला दिवसाच्या निमित्ताने दि नॅशनल अकॅडमी ऑफ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com