नागपूर :- फिर्यादीचे मावशीचा मुलगा नामे सोहेल खान उर्फ चाँद फिरोज खान वय २३ वर्ष रा. वनदेवी नगर, अञ्जा किराणा दुकाना जवळ, यशोधरानगर, नागपूर याचे ०२ महिन्या पूर्वी एका लग्माचे कार्यक्रमात जेवन वाढण्यावरून आरोपी सोबत भांडण झाले होते. याच कारणावरून दिनांक २२,०५,२०२५ चे १५.०० वा. चे सुमारास, फिर्यादीचा मावस भाऊ पोलीस ठाणे यशोधरानगर हद्दीत वनदेवी चौक जवळ गुलशन नगर कडे जाणाच्या रोडवरून जात असता आरोपी क. १) शेख शादाब उर्फ गोलू वल्द शेख शहजाद वय २६ वर्ष, २) मोहम्मद सादीक अंसारी उर्फ गोलू मोहम्मद साबीर अंसारी वय २९ वर्ष, ३) शेख नौशाद शेख शहजाद वय ३० वर्ष सर्व रा. वनदेवी नगर, यशोधरानगर, नागपूर यांनी संगणमत करून फिर्यादीचे मावस भावास चाकूने पोटावर, डोक्यावर, चेहऱ्यावर, पायावर वार करून जिवानीशी ठार केले.
याप्रकरणी फिर्यादी अब्दुल आसीफ अब्दुल लतीफ खान वय ३० वर्ष रा. वनदेवी नगर, अज्जा किराणा दुकाना जवळ, यशोधरानगर, नागपूर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे यशोधरानगर येथे पोउपनि हटकर यांनी आरोपींविरूध्द कलम १०३(१), ३(५) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध घेवुन तिन्ही आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.