जागतिक योग दिनी “सामूहिक योगाभ्यास” कार्यक्रमासाठी मनपा सज्ज

– मनपात विविध सामाजिक संस्थांची बैठक; आयुक्तांनी घेतला तयारींचा आढावा

नागपूर :- जागतिक योग दिनाचे औचित्यसाधून नागपूर महानगरपालिकेच्या वतीने येत्या शुक्रवार 21 जून रोजी धंतोली स्थित यशवंत स्टेडियम येथे सकाळी 6.00 वाजता सामूहिक योगाभ्यास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मनपाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असून, आयोजनासाठी मनपा पूर्णतः सज्ज आहे. जागतिक योग दिवसानिमित्ताने आयोजित कार्यक्रमाची तयारी, स्वरूप आणि विविध संस्थांच्या सूचना जाणून घेण्याच्या दृष्टीने शुक्रवार (ता.14) रोजी नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.

मनपा मुख्यालयातील आयुक्त सभाकक्षात आयोजित बैठकीत मनपाचे अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर, उपायुक्त मिलिंद मेश्राम, शिक्षणाधिकारी प्रफुल्ल कचवे, क्रीडा अधिकारी डॉ. पियुष आंबुलकर यांच्यासह पी.टी.एस.चे प्रशांत कुलकर्णी,  जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाचे अतुल मुजुमदार, सोम किरण, प्रशांत राजूरकर, सुनिल अग्रवाल, पतंजली योग समितीचे प्रदीप काटेकर, दीपक येवले, शिवम भुनाटी, तेजस्वीनी महिलामंचच्या किरण मुंदडा, आदर्श विद्यामंदिरचे सचिन इटनकर, संदेश खरे, अनिल मोहगावकर, डॉ. मंजिरी भेंडे यांच्यासह कर्मचारी अधिकारी स्वयंसेवी संस्थांचे स्वयंसेवक प्रामुख्याने उपस्थित होते.

बैठकीत सर्वप्रथम क्रीडा अधिकारी डॉ. पियुष आंबुलकर यांनी संपूर्ण आयोजनाची माहिती दिली. त्यानंतर आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी सामूहिक योगाभ्यास कार्यक्रमाच्या तयारींचा आढावा घेत, सर्व संस्थांच्या सूचना व नवकल्पना जाणून घेतल्या. तसेच चर्चा करून त्याबाबत कार्यवाहीचे निर्देश दिले. आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी आयोजनासाठी यंदाच्या “योग फॉर सेल्फ अँड सोसायटी” (Yoga for Self and Society) या संकल्पनेवर आधारित कार्यक्रमाची रूपरेषा तयार करावी, संपूर्ण कार्यक्रम हा शून्य कचरा अर्थात “झीरो वेस्ट इव्हेंट” वर आधारित असावा, पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था करावी योगाभ्यासाकां करीता यशवंत स्टेडियमवर पोहचण्यासाठी बसेसची सुविधा करावी. निर्देश त्यांनी यावेळी दिले. तसेच अनेक संस्थांनी योग दिनाला आपल्या तयारीची माहिती सादर केली.

मार्गदर्शन करीत आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले की, नागरिकांना योगाचे महत्व पटावे, त्यांनी योगासाठी पुढे यावे या हेतूने योग मंडळ व संस्थांच्या सहकार्याने दरवर्षी मनपातर्फे जागतिक योग दिवसाच्या निमित्ताने आयोजन केले जाते. नागरिकांमध्ये योगाप्रती जनजागृती व्हावी व ते योगाकडे वळावेत यासाठी योग दिनानिमित्तच्या आयोजनाला यशस्वी करण्यासाठी सर्वांनी पुढे यावे असे आवाहनही त्यांनी केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी वसतीगृह प्रवेश संकेतस्थळावर निश्चित करावा

Fri Jun 14 , 2024
गडचिरोली :- एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली अंतर्गत अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांकरीता 13 मुलांचे व 8 मुलींचे असे एकुण 21 शासकीय वसतीगृह कार्यरत आहेत. त्यांची एकुण इमारत प्रवेश क्षमता 2115असुन त्यातील सन 2024-25 करीता रीक्त जागांवर प्रवेश घेण्याकरीता  www.swayam.mahaonline.gov.in या प्रणालीमध्ये ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करावा. गडचिरोली येथे मुलांचे दोन व मुलींचे एक असे एकुण तीन वसतीगृह आहेत. गडचिरोली वसतीगृहात इयत्ता […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com