एस. के. पोरवाल कनिष्ठ महाविद्यालयाच्या मोहम्मद हाशिरची पॉवर लिफ्टिंग मध्ये राज्यस्तरावर निवड

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- क्रीडा युवक सेवा संचालन महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी अंतर्गत क्रीडा समिती द्वारा आयोजित श्री कृष्णदास जा. जु. ग्रामीण सेवा महाविद्यालय आर्वी रोड, पिंपरी, वर्धा येथे आयोजित केलेल्या पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये विविध जिल्हा स्तरातून खेळाडू एकत्रित आले होते. त्यामध्ये एस. के. पोरवाल कनिष्ठ महाविद्यालयाचा मोहम्मद हाशिर U-19 वयोगट, वजन गट 93 किलो मध्ये आपल्या तिनही इव्हेंटमध्ये अव्वल येवून त्याने प्रथम स्थान पटकाविले. या विजयाने मोहम्मद हाशिरची राज्यस्तरीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

स्पर्धेसाठी पोरवाल कनिष्ठ महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षिका प्रा. मल्लिका नागपुरे यांनी विशेष मोलाचे मार्गदर्शन केले आणि पुढील स्पर्धेकरिता मनस्वी शुभेच्छा दिल्या. मोहम्मद हाशिरची राज्यस्तरीय निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनय चव्हाण तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सुधीर अग्रवाल व पर्यवेक्षक प्रा. वंजारी तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंदानी त्याचे अभिनंदन केले व पुढील कोल्हापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेकरिता शुभेछा दिल्या.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बजाज ऑटो ने लॉन्च किया पल्सर N150, भारत की पसंदीदा 150 सीसी का नए रूप

Thu Sep 28 , 2023
– 14.5 Ps का अधिकतम पावर और 13.5 NM टॉर्क के साथ बेहतर ब्रेकिंग और ट्रैक्शन के लिए सिंगल-चैनल ABS की सुविधा – मोनोशॉक रियर सस्पेंशन और स्पोर्टी अंडरबेली एग्जॉस्ट – यह बाइक तीन आकर्षक रंगों – रेसिंग रेड, एबोनी ब्लैक और मेटालिक पर्ल व्हाइट में उपलब्ध होगी – मूल्य 1,17,734 रुपये एक्स-शोरूम (महाराष्ट्र) नागपूर :- दुनिया की सबसे मूल्यवर्धित […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com