संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- जगातील सर्वोकृष्ठ संविधान देशाला देऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मोठा नावलौकिक मिळविला असून जगातील इतर देशात जात धर्म पंथ आणि आर्थिक विषमतेमुळे तुकडे पडत असून आपल्या देशात मात्र भारतीय संविधाना मुळे राष्ट्रीय एकात्मता कायम आहे असे प्रतिपादन आमदार टेकचंद सावरकर यांनी केले
भाजपा कामठी शहर द्वारा संविधान दिवस निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते
प्रारंभी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला आमदार टेकचंद सावरकर,भाजपा कामठी शहर अध्यक्ष संजय कनोजिया, कार्याध्यक्ष राजेश खंडेलवाल,भाजपा अनुसूचित जाती आघाडी कामठी शहर अध्यक्ष विक्की बोंबले, महेंद्र वंजारी, विकास कठाने, अवि गायकवाड यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले त्यानंतर संविधान प्रास्तविके चे सामूहिक वाचन करण्यात आले
यावेळी भाजपा पदाधिकारी प्रिति कुल्लरकर, संगीता अग्रवाल, नेहा सहारे,किरण मानवटकर, प्रभा राऊत, शुभदा खोबरागडे, रोशनी कानफाडे,निशा मेश्राम, भारती कनोजे तसेच लालसिंग यादव, प्रतिक पडोळे,उज्ज्वल रायबोले, राजेश देशमुख, आशुतोष अवस्थी,जितेंद्र खोबरागडे, मंगेश यादव,पृथ्वीराज दहाट,कपिल गायधने,प्रमोद वर्णम,शुभम पोहरे,अरविंद चवडे, नवीन खोब्रागडे, नितिन सहारे,पुष्पराज मेश्राम,राजू बावनकुळे, वसी जाफरी,अजीज हैदरी,अशफाक मसूरी,राहुल निंबर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.