– महाबोधी सहित विविध विषयावर चर्चा
नागपूर :- अखिल भारतीय भिक्खू संघाचे विदर्भ प्रदेशचे अध्यक्ष भंते प्रियदर्शी महाथेरो यांच्या अध्यक्षतेखाली न्यू कैलास नगरातील कुशीनारा बुद्ध विहार परिसरात भिक्खू संघाच्या बैठकी चे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन, भिक्खू संघाची भूमिका, नागपुरातील विविध विहारांच्या समस्या, भिक्खूंच्या समस्या, भिक्खू व उपासक यांचा समन्वय आदी विषयावर चर्चा करण्यात आल्या.
या बैठकीला प्रामुख्याने महाथेरो रेवतबोधी, महाथेरो ज्ञानबोधी, महाथेरो धम्मज्योती, महाथेरो धम्मसेवक, महाथेरो प्रज्ञाज्योती, महाथेरो धम्मोदय, महाथेरो धम्मरक्षित, महाथेरो संघकीर्ती, महाथेरो जीवक, भंते डी संघानंद, भंते धम्मरक्षित, भंते सुमंगल, भंते संघानंद, भंते नागदीप, भंते संघरत्न, भंते संघकीर्ती, भंते जीवक, भंते तीस, भंते प्रज्ञानंद, भंते परंपदा, भंते मनोरथ, भंते अशोक बोधी, भंते धम्मरथ आदी भिक्खू प्रामुख्याने उपस्थित होते.
भंते डॉ धम्मोदय यांचा सत्कार
याप्रसंगी अखिल भारतीय भिक्खू संघ, कुशिनारा बुद्ध विहार समिती, कुशिनारा बुद्ध विहार महिला मंडळ, त्रिरत्न धम्मराईज मिशन, कुशिनारा बुद्ध विहार चारिटेबल ट्रस्ट, तथागत धम्मप्रचार संघ आदींच्या वतीने डॉ भदंत धम्मोदय महास्थवीर यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
डॉ धम्मोदय यांनी भिक्खू जीवनात राहून अनेक ठिकाणी बुद्ध विहारे व अनाथालयाची निर्मिती केली. समाजात बंधुभाव वाढवण्यासाठी कार्य केले, त्यामुळे नागरिकांच्या वतीने केक कापून व चीवर देऊन डॉ धम्मोदय महाथेरो यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी भंते धम्मोदय यांनी भिक्खू संघाला वस्तूंचे व नागरिकांना भोजनदान दिले.
या कार्यक्रमाचे आयोजनासाठी उत्तम शेवडे, चंद्रशेखर केळझरे, विजय पाटील, रुपेश डांगे, अजय भगत, रमेश पाटील, वंदेव पाटील, संजय ढोबळे, शत्रुघ्न धन, संतोष कांबळे, रवींद्र पाटील, सुशील रावडे, दिव्यांशू कांबळे, नीलिमा हजारे, करुणा पाटील, ममता केळझरे, शमा कांबळे, प्रतिभा मेश्राम, उषा घोटेकर, प्रभा पाटील, वर्षा पाटील, रीता बगले, विशाखा धनविजय आदींनी विशेष परिश्रम घेतले.