अनेक सामाजिक उपक्रमांचे यशस्वी आयोजन..
सावनेर : दरवर्षी आंतरराष्ट्रीय लायन्स क्लब ऑक्टोबर मध्ये सेवासप्ताहचे आयोजन करीत असतो. याच प्रसंगाचे औचित्य साधून स्थानिक लायन्स क्लब तर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी आणि रुग्णांसाठी अनेक उपक्रमांचे नुकतेच फलदायी आयोजन करण्यात आले. याची सुरवात गांधींजयंती निमित्याने स्वच्छता अभियानाने करण्यात आली होती.
क्लब च्या “ग्रामोदय” अभियांनांतर्गत प. पू. भय्याजी महाराज सेवाश्रम सावंगी येथे “कायदेविषयक आणि आरोग्यदायी मोफत मार्गदर्शन” शिबिराचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. विलास डोईफोडे, अध्यक्ष लायन्स क्लब तर श्रीमती शालिनीताई बुधोलिया विशेषकरून उपस्थित होत्या.
या प्रसंगी समन्वयक ऍड. मनोजकुमार खंगारे व ऍड. अभिषेक मुलमुले यांनी उपस्थितांना शेती, ग्रामपंचायत नोंदी, अत्यावश्यक परवाने यासंबंधि मोलाचे मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे डॉ. श्वेता चव्हाण आणि रुकेश मुसळे यांनी अनुक्रमे दंततपासणी व नेत्र तपासणी मध्ये योगदान दिले, तसेच औषधी वाटपही करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन सरपंच अशोक डवरे यांनी केले. परिसरात क्लब तर्फे वृक्षलागवड सुद्धा करण्यात आली.
यादरम्यान लायन्स क्लब तर्फे “महिला सक्षमीकरण” कार्यक्रमाचे सुद्धा यशस्वी आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी ऍड. माधुरी चौधरी तर पोलीस अधिकारी मंगला मोकाशे आणि शिक्षिका सविता करंदीकर विशेष अतिथी व मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या. प्रसंगी यशस्वी महिलांचा सन्मान सुद्धा करण्यात आला. यावेळी डॉ. रेणुका चांडक, डॉ. अंकिता बाहेती, डॉ. श्वेता चव्हाण आणि डॉ. स्वाती पुनियानी यांनी मार्गदर्शन आणि आरोग्य तपासन्या सुद्धा केल्यात.
लहान मुलांमधील कर्करोग लक्षणे आणि उपाय यावर डॉ. आशिष चांडक यांनी अनेक पालकांना उत्कृष्ट मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे संचालन मृणालिनी बांगरे, प्रास्ताविक ऍड. अम्रता देशमुख तर आभारप्रदर्शन प्रीति डोईफोडे यांनी केले.
त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांकरिता “डेअर टू ड्रीम” या मथळ्याखाली चित्रकला -पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. शहरातील शाळांमधील ऐंशी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. यशस्वी विद्यार्थ्यांना भेटवस्तू आणि प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले.
यात साक्षी प्रजापती (सावनेर पब्लिक स्कुल) प्रथम, आचल सरयाम (भालेराव हायस्कुल) द्वितीय, पूर्वा खुसपरे (सारस्वत स्कुल ) तृतीय क्रमांकाचे विजेते ठरले तर मोक्षा निंबाळकर (के. जॉन पब्लिक स्कुल) आणि भूमिका नागठाणे (जवाहर नेहरू हायस्कुल) यांना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली. प्रा. विलास डोईफोडे यांनी उपक्रम प्रभारी म्हणून भूमिका पार पाडली. ऋषींप्रसाद कोचिंग क्लास हे या कार्यक्रमाचे प्रयोजक होते.
सेवा साप्ताहच्या आयोजनासाठी चार्टर प्रेसिडेंट वत्सल बांगरे, समन्वयक डॉ. परेश झोपे, कोषाध्यक्ष हितेश ठक्कर , डॉ. शिवम पुनियानी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले . उपक्रमांच्या यशस्वीतेसाठी किशोर सावल, पियुष झिंजूवाडिया, मनोज पटेल, प्रवीण टोणपे, शशांक देशमुख, ऍड. प्रियंका मुलमुले, चित्रा झोपे, कीर्ती टोणपे, प्रवीण सावल, डॉ. प्रवीण चव्हाण, रुपेश जिवतोडे, पवन जामदार, खुशबू सावल, पारुल सावल यांचे सहकार्य लाभले. अनेक मान्यवरांनी लायन्स क्लब च्या सेवासाप्ताहतील सामाजिक उपक्रमांची प्रसंशा केली.