स्थानिक उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘एक स्टेशन एक उत्पादन योजना’एक अभिनव उपक्रम–प्रकल्प संचालक विवेक ईलमे..

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी 

-कामठी रेल्वे स्टेशनमध्ये ‘एक स्टेशन एक उत्पादन योजनेअंतर्गत साहित्य विक्री केंद्राचा शुभारंभ

कामठी ता प्र 2:- स्थानिक प्रशासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेली ‘एक स्टेशन एक उत्पादन’ ही योजना एक अभिनव उपक्रमी योजना असून या योजनेतून स्थानिक उत्पादकांना प्रोत्साहन मिळणार आहे हे तितकेच खरे असून आज 2 ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त कामठी रेल्वे स्थानकावर शुभारंभ झालेल्या स्वप्नपूर्ती स्वयंसहायत महिला बचत गट यांनी तयार केलेल्या साहित्य विक्री केंद्राच्या माध्यमातून या समूहातील महिलांना आपल्या उत्पादनाच्या वस्तू लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी एक उत्तम मार्ग मिळाला असल्याचे मौलिक मत साहित्य विक्री केंद्राच्या उदघाटक प्रकल्प संचालक विवेक ईलमे यांनी कामठी रेल्वे स्थानकावर आयोजित साहित्य विक्री केंद्राच्या शुभारंभ प्रसंगी व्यक्त केले.
आज 2 ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्य ” एक स्टेशन एक उत्पादन “ योजने अंतर्गत महिला बचत गटाला साहित्य विक्रीकरिता बाजारपेठ उपलब्ध करण्याच्या उद्देशाने कामठी रेल्वे स्थानकावर कामठी तालुक्यातील स्वप्नपूर्ती स्वयंसहायत महिला बचत गट यांनी तयार केलेल्या सहित्य विक्री केंद्राचे उदघाटन प्रकल्प संचालक विवेक ईलमे , गट विकास अधिकारी अंशुजा गराटे व स्टेशन प्रबंधक पी. एल. मीना यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी कश्यप सावरकर, आरोग्य विस्तार अधिकारी मनीष दिघाडे,कामठी तालूका अभियान व्यवस्थापक रवी नन्होरे, महिला बचत गटाच्या महिला प्रभा पांडे, शालू भोयर, दुर्गा इरखेडे, भारती नवले, पंचायत समिती कामठी चे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
कामठी रेल्वे स्थानकावर सुरू करण्यात आलेल्या या साहित्य विक्री केंद्रातून पापड, विविध प्रकारचे लोणचे आदी उत्पादनांची येथे विक्री केली जात आहे.कामठी रेल्वेस्थानकावर स्वप्नपूर्ती स्वयंसहाय्यता महिला समूहाद्वारे निर्मित केलेल्या विविध वस्तूंचे विक्री केंद्र लावण्यात आले असून महिला बचत गटाने स्वतः उत्पादित केलेल्या वस्तू लोकांपर्यंत पोहोचविण्याचा एक सोयीस्कर मार्ग मिळाला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

प्रशासक ऐवजी विद्यमान सरपंच, उपसरपंच व सदस्यांना पूर्ववत करा !

Sun Oct 2 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी – तालुक्यातील एकूण 27 ग्रामपंचायतीचा पंचवार्षिक येत्या ऑक्टोबर महिन्यात संपुष्टात येत आहे. त्यासाठी लवकरच प्रशासक नियुक्त होणार आहे तर ओबीसी जनगणना व निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदार नोंदणी ला लागलेल्या वेळेनुसार ठराविक वेळेत निवडणूक घेण्यात निवडणूक आयोग असमर्थ असल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ग्रामपंचायत निवडणुका ह्या पुढील 3 महिन्यापर्यंत समोर जाऊ शकतात त्या विषयाच्या अनुषंगाने कामठी तालुका […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com