कीर्तिकर कदम वाद विकोपाला दाद मात्र उद्धव ठाकरेंना 

जे येत्या लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा निवडणुकीत निकाल हाती येणार आहेत ते नेमके काय कसे असतील हे मी येथे तुम्हाला सांगणार आहे, तुमच्याकडे निकाल हाती येईपर्यत माझे येथे नेमके सांगणे नोंद नक्की करून ठेवा. जे अजिबात घडणार नाही त्यावर रामदास कदम हट्टाला पेटले त्यांनी कीर्तिकारांची लफडी त्यातून जगजाहीर केली आणि एकनाथ शिंदे यांना फुक्काची बदनामी आणि डोकेदुखी सहन करावी लागली, गाव कुसाबाहेर राहणाऱ्या देखण्या डिमाण्डेड वेश्येला दिवस गेले आहेत हि बातमी पसरावी त्यातून दिवस माझ्याच मुळे गेलेले आहेत त्यावरून सरपंच आणि उपसरपंचात आधी वादावादी नंतर मारामारी होऊन दोघांनी एकमेकांना रक्तबंबाळ केल्यानंतर कसल्याशा गाठीमुळे तिचे पोट पुढे आले असे डॉक्तरांनी सांगितल्यानंतर सरपंच उपसरपंचांनी कोपऱ्यात जाऊन झालेल्या बदनामी आणि कटकटींमुळे स्वतःच्या थोबाडात स्वतःच दोन ठेवून द्याव्यात हुबेहूब नेमके हे असेच कदम आणि कीर्तिकारांच्या अलीकडे झालेल्या बदनामीची व वादाची नेमकी नक्की फलश्रुती आहे. अत्यंत विश्वसनीय बातमी अशी कि मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा निवडणूक भारतिय जनता पक्षाला लढवायची असल्याने तेथून खाजगीत केव्हाच एकनाथ शिंदे यांनी माघार घेतलेली आहे म्हणून उमेदवाराची चाचपणी आणि निवडणुकीची तयारी भाजपने फार आधीपासून तेथून यासाठी सुरु केलेली आहे कारण मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघात महाआघाडीने ती जागा उद्धव यांच्या शिवसनेला सोडलेली आहे, सुरुवातीला या जागेवर काँग्रेसने दावा केला होता पण चर्चेअंती हि जागा शंभर टक्के उद्धव सेनेला सोडण्याचे महाआघाडीने केव्हाच ठरविले आहे कारण या लोकसभा मतदार संघात केव्हाही आजही उद्याही उद्धव सेना तगडी लढत देऊ शकते हे महाआघाडीच्या, काँग्रेच्या नेत्यांना मनापासून मान्य आहे…

ज्या उफाड्या देखण्या वयात आलेल्या तरुणीचे नेमके तिसऱ्याच तरुणाशी लफडे आहे हे एखाद्या बापाने आपापसात भांडणार्या आपल्या दोन्ही मुलांना ज्यापद्धतीने समजावून सांगावेनेमकी त्याच भूमिकेत शिरत एकनाथ शिंदे यांनी फोनवरून गजानन कीर्तिकारांना आणि प्रत्यक्ष भेटीत रामदास कदमांना समजावून सांगितले कि तेथे भाजपा निवडणूक लढविणार आहे, उद्धव सेनेसमोर तेथे टिकाव लागणे अशक्य आहे त्याक्षणी त्या दोघांनी कोपऱ्यात जाऊन आपापल्या थोबाडात मारून घेतली तरीही विजय कीर्तिकारांचा झाला आणि पराजय अर्थात रामदास कदम यांचा यासाठी झाला कि कीर्तिकारांच्या घरातला साप पाहुण्यांच्या काठीने मारला गेला कारण कीर्तिकारांच्या मनासारखे आपोआप घडून आले जे त्यांना हवे होते थोडक्यात महाघाडीतर्फे या लोकसभा मतदार संघात उद्धव सेना उमेदवार देणार आहे ज्यावर अगदी सुरुवातीपासून उद्धव ठाकरे यांनी जातीने अमोल गजानन कीर्तिकर यांचे नाव फायनल केले आहे आणि आणखी एक गौप्य्स्फोट म्हणजे पोटच्या पोरासाठी एकनाथ शिंदे आणि महायुतीकडे पाठ फिरवून गजाभाऊ अमोल साठी शंभर टक्के प्रचार करणार आहेत तसा थेट निरोप त्यांनी अमोल मार्फत उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविलेला आहे ज्याची पूर्व आणि पूर्ण कल्पना गजाभाउंनी थेट फडणवीस व शिंदे दोघांनाही देऊन ठेवलेली आहे. मी यानंतर लोकसभा केवळ अमोल याच्या प्रेमापोटी अजिबात लढविणार नाही असेही त्यांनी या दोघांना स्पष्ट सांगितल्याने उद्धव सेनेसमोर रामदास कदम यांचे चिरंजीव म्हणजे आजच अमोल कीर्तिकर उद्याचे खासदार हे फडणवीस व शिंदे दोघांच्याही लक्षात आल्याने तेथे नक्कीच उद्धव सेना म्हणजे महाआघाडी विरुद्ध महायुती मधली भाजपा अशी लढत जोरदार रंगणार आहे…

यादिवसात नेमके जे सतत तुमच्या कानावर पडते आहे कि तेथे भाजपा म्हणजे महायुतीतर्फे अभिनेत्री माधुरी दीक्षित निवडणूक लढविणार आहे, मित्रांनो हा विषय देखील भाजपासाठी केव्हाच इतिहासजमा झाला आहे कारण लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी माधुरी दीक्षित यांनी स्पष्ट नकार दिला आहे त्यातून आजमितीला एकमेव माजी राज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांचे नाव पुढे आलेले आहे तेव्हापासून कृपाशंकर यांनी लोकसभा मतदारसंघात जनसपंर्क वाढविण्यास सुरुवात केली आहे. आणखी एक गौप्य्स्फोट असा कि अमोल कीर्तिकर यांनी ज्या आर्थिक भानगडी करून ठेवल्या आहेत त्यावर एकत्रित फाईल केव्हाही कधीही अमोल यांना गजाआड करू शकते, आजतागायत एकनाथ शिंदे गटाचे गजाभाऊ खासदार असल्याने या गंभीर स्वरूपाच्या पुराव्यांवर केंद्र सरकारने मूग गिळून बसणे पसंत केले असावे ज्याचा त्रास अचानक अमोल कीर्तिकारांना झाला तर एवढा दुसरा तगडा उमेदवार महाआघाडीला किंवा उद्धव युतीला सापडणे शक्य झाले नाही तर महायुतीला म्हणजे भाजपाला तेथे विजय खेचून आणणे कठीण नसेल वरून अमोल उमेदवार नसल्याने विद्यमान प्रभावी खासदार गजानन कीर्तीकर नक्कीच बेंबीच्या देठापासून महायुरीच्या प्रचारात उतरतील, महत्वाचे म्हणजे पुन्हा एकवार बाप हाच मुलाचा तारणहार ठरेल, मुलाने केलेले पाप आपोआप पुण्यात जमा होईल….

अपूर्ण : हेमंत जोशी

NewsToday24x7

Next Post

मनपाचे डॉ. विजय जोशी यांना जीवनगौरव पुरस्कार 

Mon Nov 20 , 2023
– राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा दिवस समारोहात सन्मान : मनपा व जिल्हा आयुष कक्षाचे आयोजन नागपूर :- सहाव्या राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा दिवसाच्या अनुषंगाने 18 नोव्हेंबरला अखिल भारतीय प्राकृतिक चिकित्सा परिषदेच्या संकल्पनेतून नागपूर महानगरपालिका आणि नागपूर जिल्हा आयुष कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात मनपाचे अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी यांना यंदाचा जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. शनिवारी 18 […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com